Tarun Bharat

गँगस्टर रवी पुजारीविरोधात आरोपपत्र दाखल

ऑनलाईन टीम / बेंगळूर : 

गँगस्टर रवी पुजारीविरोधात शबनम डेव्हलपर्स खून खटला आणि बिल्डरकडून खंडणी वसूल करणे या दोन आरोपांखाली आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे पोलिस सहआयुक्त संदीप पाटील यांनी ही माहिती दिली. 

रवी पुजारी सध्या बेंगळूर पोलिसांच्या ताब्यात आहे. परप्पण अग्रहरा मध्यवर्ती कारागृहात त्याला ठेवण्यात आले असून, त्याच्याविरोधात दाखल असलेल्या जवळपास 100 गुन्ह्यांचा तपास पोलीस करत आहेत. 

टिळक नगर पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या शूटआऊट प्रकरणात पुजारीच्या गुंडांनी शबनम डेव्हलपर्सच्या कार्यालयात घुसून दोन कर्मचार्‍यांना गोळ्या घातल्या होत्या. या प्रकरणात 11 जणांना अटक करण्यात आली असून, या मारेकऱ्यांना पुजारीने शस्त्रे पुरवली होती. तर खंडणी प्रकरणात त्याचे कॉल डिटेल्स आणि इतर काही पुरावे जमा करण्यात आले आहेत.

शबनम डेव्हलपर्स खून प्रकरणानंतर तो 15 वर्ष फरार होता. दक्षिण आफ्रिकेत त्याला पकडल्यानंतर सेनेगलमध्ये त्याची रवानगी करण्यात आली होती. 23 फेब्रुवारीला त्याला भारतात आणण्यात आले आहे. त्यांच्यावर दाखल असलेल्या इतर गुन्ह्यांचा तपास करून, त्या प्रकरणांची आरोपपत्र दाखल करण्यात येतील, असेही पाटील यांनी सांगितले.

Related Stories

महाराष्ट्रातील हॉटेल, रेस्टॉरंट, बार 5 ऑक्टोबरपासून सुरु

Tousif Mujawar

भारतातील यंदाचा मान्सून सामान्य राहणार – IMD

Archana Banage

लोककल्याणकारी सरकार असमानता निर्माण करून भांडवलशाहीला चालना देऊ शकत नाही : वरुण गांधी

Abhijeet Khandekar

कोरोनाबाधितांना आता मुंग्यायुक्त अंडी!

Patil_p

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी घेतली कोविड आढावा बैठक

Archana Banage

महाराष्ट्राच्या सागरने संगमेशला दाखविला घिस्सा

Amit Kulkarni