Tarun Bharat

‘गंगानाथ सिटी मार्केट’चे फोंडय़ात उद्घाटन

Advertisements

प्रतिनिधी /फोंडा

शांतीनगर फोंडा येथील कॉर्पोरेशन बँकेसमोर जॅरी अपार्टमेंटच्या तळमजल्यावर मनिषा नाथ पै यांच्या मालकीच्या ‘गंगानाथ सिटी मार्केट’ या नवीन आस्थापनाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. उद्घाटन सोहळय़ाला डॉ. नूतन देव, फोंडा पालिकेच्या नगराध्यक्ष गिताली तळावलीकर, नगरसेविका अमिना नाईक, प्रिया नाईक, मेघना सचिन केणी या उपस्थित होत्या.

या आस्थापनात घरगुती वापरासाठी लागणाऱया वस्तू, भाजी, दूध, फळे, मिठाई, फरसाण व इतर जीवनावश्यक वस्तू उपलब्ध आहेत. डॉ. नूतन देव व इतर मान्यवरांनी मनिषा पै यांना शुभेच्छा दिल्या. या आस्थापनातर्फे सामानाची घरपोच सेवा दिली जाणार आहे. खरेदीसाठी येणाऱया ग्राहकासाठी वाहन पार्किंगची सोय तसेच दर्जेदार सेवेमुळे आस्थापन लवकरच ग्राहकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास मनिषा पै यांनी व्यक्त केला. सकाळी 8 ते रात्री 9 वा. यावेळेत आस्थापन खुले राहणार आहे. मेघना केणी यांनी स्वागत तर मनिषा पै यांनी आभार मानले.

Related Stories

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे ध्येय

Amit Kulkarni

शशिकला काकोडकर यांची जयंती महिला सशक्तीकरण दिन म्हणून साजरी करावी

Patil_p

कुंभारजवेत यंदा मडकईकर घरणेशाही संपणार

Amit Kulkarni

पुरस्कारप्राप्त शिक्षकांना यापुढे सेवेत मुदतवाढ नाही

Patil_p

आतीलपेठ मठमंदिरात 13 रोजी नवा सोमवार उत्सव

Amit Kulkarni

सावळे येथील अखिल गोवा नृत्य स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

Amit Kulkarni
error: Content is protected !!