Tarun Bharat

‘गंभीर’ भेटीत जिंकून गेले धोनीचे स्मित हास्य!

Advertisements

मुंबई / वृत्तसंस्था

2011 वनडे विश्वचषक जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलणारे महेंद्रसिंग धोनी व गौतम गंभीर अलीकडील कालावधीत प्रतिकूल कारणासाठीच अधिक चर्चेत रहात आले असून धोनीने कधीही प्रत्युत्तर दिले नसले तरी गौतम गंभीरने संधी मिळेल त्यावेळी धोनीवर भरपूर तोंडसुख घेतले आहे. गुरुवारी लखनौ व चेन्नई सुपरकिंग्स यांच्या लढतीनंतर मात्र वेगळेच चित्र अनुभवाला आले. येथे या दोन्ही दिग्गजांनी काही मिनिटे दिलखुलास संवाद साधला आणि या भेटीची छायाचित्रे त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाली नसती तरच नवल होते!

यंदाच्या आयपीएल स्पर्धेत गौतम गंभीर लखनौ सुपरजायंट्स संघाचा मेंटर म्हणून कार्यरत आहे तर त्याचा माजी राष्ट्रीय संघसहकारी व चेन्नईचा माजी कर्णधार धोनी यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून समाविष्ट आहे. गुरुवारी हे दोघेही दिग्गज समोरासमोर आल्यानंतर काही मिनिटे दिलखुलास बोलले आणि गंभीरने स्वतः नंतर याचे एक छायाचित्र आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ‘स्कीपरशी बोलून खूप बरे वाटले’, असे नमूद केले. या छोटय़ाशा संवादादरम्यान धोनीचे स्मित हास्य देखील बरेच काही सांगून गेले आणि यानंतर उभयतांच्या भेटीचे छायाचित्र व्हायरल होत राहिले.

Related Stories

निखत झरीन उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

‘त्या’ पार्टीनंतर युसेन बोल्ट ‘पॉझिटिव्ह’, ख्रिस गेल ‘निगेटिव्ह’

Patil_p

बांगलाविरुद्ध कसोटीसाठी विंडीजचा संघ जाहीर

Amit Kulkarni

कसोटी मालिकेतून कर्णधार विल्यम्सन बाहेर

Patil_p

चेन्नई संघव्यवस्थापन नाराज लवकरच काही खेळाडूंची उचलबांगडी?

Patil_p

सुदिरमन चषक स्पर्धेतून चिराग-सात्विकची माघार

Patil_p
error: Content is protected !!