Tarun Bharat

गंभीर मारहाण केलेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Advertisements

संशयितावर खूनाचा गुन्हा दाखल

प्रतिनिधी/ सातारा

वाढेफाटा येथील शिवतेज हॉटेलसमोर सदरबझार येथील एकाने दारूच्या नशेत मारहाण केलेल्या युवकांचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला आहे. सचिन उमेश कांबळे (वय 36, रा. जयमल्लार हौसिंग सोसायटी सदरबझार सातारा) असे मयताचे  नाव आहे. या प्रकरणी महेश रमेश सपकाळ (वय 24, रा. वाढे ता. सातारा) याच्यावर खूनाच्या कलमाअर्तंगत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मयत सचिन उमेश कांबळे व महेश सपकाळ हे मित्र आहेत. सचिनचा मोबाईल व पैसे महेश याने घेतले होते. दि. 29 रोजी मोबाईल व पैसे मागण्यासाठी सचिन महेशकडे गेला होता. यावेळी महेशने पैशाची दारू प्रशान केली असे सांगितले. यावरून दोघांच्यात वाद सुरू झाला. या वादात महेश याने सचिनच्या डोक्यात व पाठीवर मारहाण केली. या मारहाणीत तो जखमी झाला. जखमी अवस्थेत तो घरी गेला. त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल केले. सात दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु उपचारदरम्यान, त्यांचा दि. 4 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. सचिनचा मित्र महेश सपकाळ याने दारूच्या नशेत त्याला मारहाण करून डोक्यात गंभीर दुखापत केली. यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस महेश सपकाळ हा जबाबदार असल्याने त्याच्याविरूद्ध आत्या मीना नारायण कांबळे (वय 35, रा. गुरूवार पेठ सातारा) यांनी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या गुह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. के. मोरे करत आहेत.

Related Stories

शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठीची मतदान केंद्राची तयारी

Abhijeet Shinde

विजेच्या धक्क्याने सोसायटी चेअरमनचा मृत्यू

Patil_p

अख्ख्या गल्लीची चाळण करुनही लिकेज सापडेना!

Abhijeet Shinde

एमआयडीसीला चोरटय़ांची साडेसाती

Patil_p

मुख्यमंत्री ठाकरे कोयनानगरकडे रवाना

datta jadhav

महाबळेश्वर येथे कार अपघात, तीघे गंभीर जखमी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!