Tarun Bharat

गगनगड रस्त्यावरील मोरीचे काम सुरू

प्रतिनिधी / गगनबावडा                 

गगनबावडा ते मर्द किल्ले गगनगड दरम्यानच्या रस्त्यावरील मोरी ढासळल्याने गडाकडे जाणारी वाहतूक पूर्णता बंद पडली आहे.भाविक आणि पर्यटकांना पायपीट करावी लागत होती.या मोरीचे  काम काही दिवसांपासून सुरू झाले आहे.दिवाळी नंतर मंदिरे खुली होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.त्यामूळे येथील भाविक व पर्यटकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 
         

यावर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या काळात गगनगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोरीचा अर्धा भाग ढासळून खोल दरीत ५० मिटर अंतरावर गेला आहे.येथील विठ्ठलाई मंदिरच्यापुढे लागणाऱ्या पहिल्याच वळणावरील  ही मोरी जमिणदोस्त झाली आहे.दुचाकी गाडी सुद्धा पुढे जात नसल्याने भाविक व पर्यटकांची अडचण बनली होती.गगनबावडा तालुक्यात येणारा पर्यटक हा गगनगडावर जातोच पण ही मोरीच ढासळल्याने गैरसोयीचे बनले होते. कोरोणा रोगाच्या पार्श्र्वभूमीवर शासनाने संचारबंदी लागू केली होती.तालुका प्रशासनाने पर्यटन बंदीची काटेकोर अंमलबजावणी केली होती. 

पर्यटन स्थळे व मंदिरे भाविकांना बंद केली होती.तरीही पावसाळी पर्यटनासाठी येथे गर्दी केली होती.शेवटी प्रशासनाने पोलीस वर्दीचा धाक दाखवून त्यांना लगाम घातला होता.गेल्या काही दिवसांपासून संचारबंदी शिथिल केली आहे.गगनगडाचे प्रवेशद्वार अद्यापही बंद आहे.अधूनमधून पर्यटकांची ये-जा सुरु असते.खराब मोरीमूळे लोकांना एक किमी.अंतर पायपीट करावी लागते. गगनगडाकडे ने-आण करावे लागणारे  साहित्य डोक्यावरुन न्यावे लागते.येथील जनतेची होणारी गैरसोय लक्षात घेऊन  तालुका  बांधकाम विभागाने या मोरीच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.पुढील महिन्यात मर्द किल्ले गगनगडावर होणाऱ्या श्री दत्त जयंती सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविकांची गर्दी होते.

Related Stories

लसीकरणाची गती मंदावल्यास महाराष्ट्रात करोनाची तिसरी लाट ; तज्ज्ञांचा इशारा

Archana Banage

आम्ही राज्यात नवे उद्योग आणू

datta jadhav

Kolhapur; ‘कौन बनेगा करोडपती शो’मध्ये कोल्हापूरच्या शशांक चोथे यांचा सहभाग

Abhijeet Khandekar

सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाणी पातळीची स्थिती

Archana Banage

Pegasus Spyware : हेरगिरीचं काम पंतप्रधान मोदी आणि भाजप करतंय – नाना पटोले

Archana Banage

सातारकरांनो, आता तरी शहाणे व्हा

Patil_p