Tarun Bharat

गजानन महाराजनगरात नाला स्वच्छता मोहीम सुरू

Advertisements

पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही याची महापालिकेच्या अधिकाऱयांकडून खबरदारी

प्रतिनिधी / बेळगाव

मागील वषी नाल्यांची स्वच्छता व्यवस्थित झाली नसल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होऊन विविध कॉलनीमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे यंदा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून नाला स्वच्छता करण्याची मागणी करण्यात आली होती. याची दखल घेत महानगरपालिकेने टिळकवाडी भागातील नाल्याची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.

 महापालिकेच्यावतीने दरवषी पावसाळय़ापूर्वी नाल्यांची स्वच्छता केली जाते. मात्र, यदा पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने नाला स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली नव्हती. मागील वषी काही नाल्यांची स्वच्छता व्यवस्थित करण्यात आली नव्हती. ठिकठिकाणी नाल्यांमध्ये कचरा साचला होता. झाडेझुडुपे वाढल्याने कचरा अडकून सांडपाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला होता. नाल्यांवरील अतिक्रमणामुळे काही ठिकाणी नाले अरुंद झाले आहेत. याकडे महापालिकेच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले होते. मागील वषी झालेल्या पावसाळय़ात याचा फटका नागरिकांना बसला. पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला नसल्याने नाले ओव्हर-फ्लो होऊन घरांमध्ये पाणी शिरले होते. मागील वषी पावसाचा फटका विशेषतः टिळकवाडी भागातील नागरिकांना बसला. मराठा कॉलनी, नानावाडी, काँग्रेस रोड, महात्मा गांधी कॉलनी, शांती कॉलनी, इंद्रप्रस्थ नगर, शिवाजी कॉलनी अशा विविध भागात संपूर्ण रस्ते पाण्याखाली गेले होते. दरवषी पावसाळय़ात या भागात पाणी साचते. मागील वषी झालेल्या जोरदार पावसामुळे आठ दिवस पाण्याचा निचरा झाला नव्हता. त्यामुळे रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. निर्माण झालेल्या परिस्थितीला जबाबदार कोण? असा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.

ठिकठिकाणी नाल्यांच्या तोंडावर टेलिफोन केबल, जलवाहिन्या आणि गॅस वाहिन्या असल्याने कचरा साचून पाणी वाहण्यास अडचणी निर्माण झाल्याचे निदर्शनास आले होते. काही नाले अरुंद असल्याने निचरा होत नव्हता. काही ठिकाणी नाले अरुंद आणि नाल्यांमध्ये झाडेझुडुपे असल्याचे दिसून आले होते.   पावसाळय़ापूर्वी नाल्याची स्वच्छता करण्याची मागणी माजी नगरसेवक पंढरी परब यांनी केली होती. त्यामुळे या समस्यांबाबतचे वृत्त तरुण भारतने प्रसिद्ध केले होते. याची दखल घेऊन महापालिकेच्या अधिकाऱयांनी गजानन महाराज नगर परिसरातील तसेच टिळकवाडी परिसरातील नाल्यांची स्वच्छता मोहीम राबवून झाडेझुडुपे हटविण्याचे काम हाती घेतले आहे. नाल्यामध्ये असलेला गाळ काढला आहे. एकंदर नाल्याची स्वच्छता करून पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही याची खबरदारी महापालिकेच्या अधिकाऱयांनी घेतली आहे.

Related Stories

विविध ठिकाणी पर्यावरण दिन साजरा

Amit Kulkarni

आम्हालाही व्यवसाय करण्यास मुभा द्या

Amit Kulkarni

मच्छेतील भाऊ-बहिणीला कराटेमध्ये सुवर्ण-कांस्य

Amit Kulkarni

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पाऊल उचला

Patil_p

निवडणूक लढविण्याचे स्वप्न; पण मतदारयादीतून गायब

Patil_p

ज्ञान प्रबोधन मंदिरमध्ये सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक

Amit Kulkarni
error: Content is protected !!