Tarun Bharat

गटशिक्षणाधिकाऱयाची शिक्षिकेकडे शरीरसुखाची मागणी

वारंवारच्या त्रासाला कंटाळून पीडितेची शिक्षणाधिकाऱयांकडे तक्रार : पंचायत समितीच्या विशाखा समितीकडे गेले प्रकरण

प्रतिनिधी /सातारा

सातारा जिल्हय़ातील एका गटशिक्षणाधिकाऱयांनी एका महिला शिक्षिकेच्या एकाकीपणाचा फायदा घेत तिला वारंवार त्रास देत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली आहे. सदरच्या शिक्षिकेने या त्रासापासून सुटका व्हावी या हेतूने गटशिक्षणाधिकाऱयांकडुन होत असलेल्या दुष्कत्याबाबतची तक्रार शिक्षणाधिकाऱयांकडे केली आहे. शिक्षणाधिकाऱयांनी दि. 14 जून 2021 रोजी विशाखा समितीकडे हे प्रकरण पाठवले असून त्या गटशिक्षणाधिकाऱयांना विशाखा समितीने पाठीशी घातले तर त्या शिक्षिकेचा बळी जाईल, अशी भीती शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. या प्रकाराची कानकूण लागल्यानंतर अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. तर संबंधित शिक्षिकेला न्याय मिळवून देण्यासाठी बऱयाच संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

गटशिक्षणाधिकाऱयांनी पदभार स्वीकारल्यापासून चांगले काम करायचे सोडून राजकीय बळाचा वापर करुन तालुक्यातील शिक्षक, पेंद्रप्रुमख, विस्तारअधिकारी एवढेच नाही तर शिक्षण विभागातील कर्मचाऱयांना नाहक त्रास दिल्याच्या अनेक तक्रारी झाल्या आहेत. दर्जेदार शिक्षण देण्याच्या नावाने बोंबच. पण नव्याने प्रकार उघडकीस आला असून एका महिला शिक्षिकेला तिच्या एकटेपणाचा फायदा घेवून छेडछाड करत असल्याने ती त्रासून गेली आहे. त्या होत असलेल्या त्रासाला कंटाळून त्या महिला शिक्षिकेने आपली तक्रार प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांच्याकडे केली आहे. कोळेकर यांनी आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशीसाठी विशाखा समितीच्या अध्यक्षा गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांच्याकडे पाठवली आहे.

जिल्हय़ात शिक्षणाला काळीमा फासण्याचा प्रकार गटशिक्षणाधिकाऱयांकडून सुरु आहे. त्या महिला शिक्षिकेने दि. 22 एप्रिल 2021 ला जिल्हा परिषदेकडे तक्रार केली असून त्यात म्हटले आहे, की संबंधित गटशिक्षणाधिकारी हे अनैतिक व मानसिक छळ करत आहेत. त्यांनी त्या शिक्षिकेला पंचायत समितीत बोलवून कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्या शिक्षिकेच्या पतीचे निधन झालेले असतानाही तुमचे मिस्टर कुठे असतात?, तुमची बदली करु का?, कोंढवलीला जाता, चिंचणेरला येता का?, असे प्रश्न विचारुन मानसिक खच्चीकरण केले. 31 जानेवारी 2020 रोजी मुख्याद्यापक सातारला कामानिमित्त गेल्या असता ते अचानक दुपारी शाळेवर आले. ते रिकाम्या वर्गात जावून बसले. त्यांनी विद्यार्थ्यांची चौकशी न करता यंदा पाऊस जास्त झाला आहे, उसाला तुरे आलेत, असे शब्द प्रयोग त्या शिक्षिकेला करत त्यांच्याकडे एकटक पाहू लागले. शाळा सुटल्यानंतर चार चाकीने घरी सोडतो असा आग्रह त्यांच्याकडे धरु लागले. 10 जुन 2020, दि. 17 जुन 2020 रोजी ते महिला शिक्षिकेच्या घरी गेले. त्यांच्या मुलीला बाहेर पाठवून त्यांना गटशिक्षणाधिकारी म्हणाले, तुला काही त्रास होवू देणार नाही. परंतु मी तुझ्यावर दया म्हणून तुझ्याकडे शरीरसुखाची अपेक्षा करत आहे. त्यासाठी आपण दोघे एकमेकांच्या जवळ येवू. तु नकार देवू नकोस. आपण जवळ आलो तर तुला शाळेत कसलाही त्रास होणार नाही. असे म्हणून मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले गेले असल्याचे म्हटले आहे. त्यावरुन हे प्रकरण खूप भयंकर असून त्याबाबत रामदास साळुंखे, अलका बोभाटे यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत गटशिक्षणाधिकाऱयांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

विशाखा समितीकडे पुढील कार्यवाहीसाठी प्रकरण पाठवले आहे

माझ्याकडे आलेल्या तक्रारीनुसार पुढील चौकशीकरता सातारा पंचायत समितीच्या विशाखा समितीकडे पाठवण्यात आले आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल.

प्रभावती कोळेकर -प्राथमिक शिक्षणाधिकारी

अहवाल तयार करुन कार्यवाहीसाठी पाठवण्यात येईल

चौकशी सुरु आहे. त्या महिलेने केलेल्या तक्रारीची दुसरी बाजू तपासून विशाखा समितीचा अहवाल तयार करुन कार्यवाहीसाठी पुढे पाठवण्यात येईल. त्यानुसार कार्यवाही होईल.

सुवर्णा चव्हाण -गटविकास अधिकारी

सीईओ साहेब अशा वृत्तींना सवलत देवू नका

सीईओसाहेब सातारा जिह्यात केंद्र प्रमुखांवर महिलेने केलेल्या तक्रारीवरुन त्यांच्यावर आपणाकडून कारवाई करण्यात आल्याची प्रकरणे आहेत. मात्र, गटशिक्षणाधिकाऱयांकडून जर महिला शिक्षिकेला जर तिच्या घरी जावून शरीरसुखाची मागणी केली जात असेल तर निंदनीय बाब आहे. त्यामुळे गटशिक्षणाधिकाऱयास सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी पंचायत समितीचे सदस्य रामदास साळुंखे यांनी केली आहे.

Related Stories

साताऱयातील होम आयसोलेशन बंद करणार

Amit Kulkarni

संपूर्ण अनलॉककडे जिल्ह्यासह राज्याच्या नजरा

datta jadhav

साताऱयात फळविक्रेत्यांमध्ये राडा अन् तरुणांचा हैदोस

Patil_p

राजवाडा साफसफाईचे राजमाता कल्पनाराजेचे आदेश

Patil_p

उत्पादन शुल्क विभागात तीन जण सापडलेले हे हिमनगाचे टोक

Patil_p

युवतींनी नवीन कला, कौशल्यात पारंगत व्हावे : खा. श्रीनिवास पाटील

datta jadhav