Tarun Bharat

गटारीत अडकलेल्या कुत्र्याच्या पिल्लाची सुटका

प्रतिनिधी /बेळगाव

एखाद्या लहान प्राणी अडचणीत सापडल्यास लहान मुलांना त्याची काळजी अधिक असते. महात्मा फुले रोड परिसरात गटारीमध्ये दोन दिवसांपासून कुत्र्याचे पिल्लू अडकले होते. कुत्र्यांचा आवाज ऐकून सर्वांचीच घालमेल वाढली होती. अखेर कुत्र्यांच्या पिल्लाची सुटका दोन मुलांनी केली.

गटारीमध्ये कुत्र्याचे पिल्लू अडकल्याची माहिती प्राणी दया संघटनेच्या पदाधिकाऱयांना मिळाली. त्यामुळे त्याठिकाणी कुत्र्यांची सुटका करण्यासाठी ते पोहोचले. पण कुत्र्याचे पिल्लू गटारीवरील फरशीच्या आत असल्याने काढता आले नाही. त्यामुळे याच परिसरात राहणाऱया प्रतिश आणि विशाल या दोन मुलांनी मदतीचा हात पुढे करून पिल्लाला तेथून बाहेर काढले. त्याबद्दल त्या दोन्ही मुलांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी प्राणी दया संघटनेचे प्रसाद व शुभम उपस्थित होते.

Related Stories

नियमाचे उल्लंघन करणाऱया वाहनधारकांवर कारवाई

Patil_p

हाणामारीत जखमी युवकाचा मृत्यू

Patil_p

गाणीग समाजाला 2 अ प्रमाणपत्र देण्यास अधिकाऱयांना भाग पाडा!

Omkar B

अपुऱया केजमुळे कुत्र्यांच्या नसबंदी मोहिमेत अडचण

Amit Kulkarni

उद्यमबाग परिसरात आजपासून वीजपुरवठा खंडित

Amit Kulkarni

वडगाव रस्त्यावरील खड्डे कधी बुजणार?

Patil_p