Tarun Bharat

गटार कोसळल्यामुळेच रस्ता बंद करावा लागला

मनपा अभियंत्यांचे स्पष्टीकरण

प्रतिनिधी / पणजी

येथील पोस्ट ऑफिसच्या जुन्या इमारतीसमोर दयानंद बांदोडकर रस्त्यावर पोर्तुगिजकालीन जुने गटार साफ करताना अचानक ते कोसळल्यामुळे सोमवारी सकाळी वाहतुकीचा खोळंबा झाला होता, असे मनपाच्या अभियंत्याने सांगितले. एका बाजूने गटार साफ करताना दुसऱया बाजूने वाहतूक सुरु ठेवली असती तर वाहतुकीचा खोळंबा झाला नसता. अचानक गटार कोसळल्यामुळे संपूर्ण रस्ताच वाहतुकीस बंद करावा लागला, असेही अभियंत्यानी सांगितले.

पणजी महानगरपालिकेतर्फे दयानंद बांदोडकर रस्त्यावरील गटार साफ करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. काम सुरु असताना सोमवारी वाहतुकीचा खोळंबा झाला होता. सर्वत्र संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत होत्या. त्याच्यावर मनपा अभियत्यांनी वरील प्रमाणे स्पष्टीकरण दिले.

उद्यापर्यंत काम पूर्ण होणार

वास्तविक रस्त्याच्या एका बाजूने वाहतूक सुरु ठेवून दुसऱया बाजूने काम सुरु केले होते. या कामाची सुरुवात शनिवारी करण्यात आली होती. सुट्टीचा दिवस असल्याने वाहतूकही कमी प्रमाणात होती. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून रितसर परवाना घेणे आवश्यक नव्हते. मात्र अचानक संपूर्ण रस्त्यावरील गटार कोसळल्याने पूर्ण रस्ता वाहतुकीस बंद करावा लागला. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. गटाराची खोलाईही दीड ते दोन मिटर असल्याने सगळेच अवघड झाले. कामाचा व्यापही वाढला आहे. तशाही स्थितीत अधिकाधिक काम पूर्ण झाले असून 17 जून पर्यंत काम संपून पूर्ण रस्ता वाहतुकीस मोकळा होईल, असेही अभियंत्यांनी सांगितले.

मंगळवारी नियोजनामुळे वाहतूक सुरुळीत गटाराचे काम सुरु असताना सोमवारी सकाळपासून वाहतुकीचा खोळंबा झाला होता. अचानक घडलेल्या घटनेबाबत वाहतूक पोलिसांनाही काही माहित नव्हते त्यामुळे वाहतूक पोलिसांनाही कोणतीच तयारी करायला वेळच मिळाला नाही. मंगळवारी वाहतूक पोलिसांनी व्यवस्थित नियोजन करून ठिकठिकाणी सकाळपासूनच पोलीस तैनात केल्यामुळे वाहनांचा वेग कमी करावा लागला मात्र वाहतूक खोळंबा झाला नाही.

Related Stories

हेडलॅण्ड सडय़ावर भटक्या गुरांचा संशयास्पदरीत्या मृत्यू, एकाला वाचवण्यासाठी लोकांची धावपळ

tarunbharat

शिक्षण क्षेत्रात भाऊसाहेबांच्या स्वप्नांना ठेच पोचविण्याचे प्रयत्न : ढवळीकर

Amit Kulkarni

…तर शाळा आम्ही चालवतो!

Amit Kulkarni

संजीवनी साखर कारखाना बंद होणार

tarunbharat

चोरटा विनाहेल्मेट गेला अन् पोलिसांच्या तावडीत सापडला

Omkar B

वास्कोतील भयानक स्थितीला सरकारच जबाबदार

Patil_p