Tarun Bharat

गडहिंग्लजमधील बहीण-भाऊ पॉझिटिव्ह

प्रतिनिधी / कोल्हापूर

गडहिंग्लज तालुक्यातील बहिणभावांचे रिपोर्ट रविवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्हय़ातील कोरोनाग्रस्तांची संख्या ७३७ वर पोहोचली आहे. दरम्यान, १८ कोरोनाग्रस्तांचे दुसरे स्वॅब रिपोर्टही निगेटिव्ह आल्याने त्यांनाही लवकरच डिसचार्ज दिला जाणार असल्याची माहिती सीपीआरमधून देण्यात आली.

जिल्हय़ात रविवारी सकाळी १० वाजेपर्यत ६०७ जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील ७३ जणांचे स्वॅब घेतले असून ५० जणांना आयसोलेटेड केले आहे. सकाळी १ स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सायंकाळी गडहिंग्लज तालुक्यातील २० वर्षीय तरूणी आणि तिचा १३ वर्षांचा भाऊ यांचे स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्हय़ातील पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ७३७ वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ६८३ झाली आहे.

दरम्यान, सीपीआरमध्ये उपचार घेत असलेल्या १८ कोरोनाग्रस्तांचे दुसरे स्वॅब रिपोर्ट रविवारी निगेटिव्ह आले. यामध्ये कोल्हापूर शहरातील ६, शाहूवाडी तालुक्यातील ४, करवीर तालुक्यातील ४, चंदगड तालुक्यातील २ आणि आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील एकाचा समावेश आहे. लवकरच त्यांना डिसचार्ज दिला जाणार आहे. जिल्हय़ात रात्री ८ वाजेपर्यत १ हजार २६८ जणांची तपासणी करण्यात आली. तसेच १८९ जणांचे स्वॅब घेतले असून ९५ जणांना आयसोलेटेड केले आहे. तसेच १५५ रिपोर्टपैकी ३ पॉझिटिव्ह आणि १५० निगेटिव्ह आले आहेत. दिवसभरात ७ जणांना डिस्चार्ज मिळाल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Related Stories

पहिला हिशोब मगच निवडणूक, चित्रपट महामंडळाच्या सदस्यांची मागणी

Archana Banage

आमदार आसगावकर यांच्या विजयाने कोल्हापूरचा सन्मान – छ. शाहू महाराज

Archana Banage

एसटी महामंडळाला शासनाची 600 कोटींची मदत

datta jadhav

सातारारोडमध्ये फरसाणा कंपनी आगीत खाक

Patil_p

जावली तालुक्यात कोरोनाची अँन्टीजेन टेस्ट सुविधा उपलब्ध

Patil_p

कोल्हापूर : खुशाली द्या… अन्यथा दंड!

Archana Banage