Tarun Bharat

गडहिंग्लजला ग्रामसेवकांच्या पत्नी व मुलाची गळफास घेवून आत्महत्या

प्रतिनीधी / गडहिंग्लज

गडहिंग्लज शहरातील घाळी नगर येथे राहणाऱ्या ग्रामसेवक आनंदा मधूकर कोठावळे यांच्या पत्नी वैशाली आनंदा कोठावळे (वय ४४) व मुलगा अवधूत आनंदा कोठवळे (मुळगाव कोगे, ता करवीर) यांनी शुक्रवारी रात्री ९.३० च्या दरम्यान राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली आहे. येथील पंचायत समितीत काम करणारे ग्रामसेवक कोठावळे दोन दिवस कामानिमित्य बाहेर गावी गेले असताना त्यांना घरी फोन केले. पण कोणही उचलत नसल्याने शुक्रवारी रात्री घरी येवून पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

दोघांनी केलेल्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून या घटनेची फिर्याद गडहिंग्लज पोलीसांत ग्रामसेवक आनंदा कोठावले यांनी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास गडहिंग्लज पोलीस करत असून घटनास्थळी भेट दिली आहे.

Related Stories

कोल्हापूर विमानतळावरून कार्गो वाहतूक सेवेला मंजुरी

Abhijeet Khandekar

फौंड्री इलेव्हेंटर मशीनमध्ये सापडून कामगार ठार

Archana Banage

महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट, कर वसुली वाढवा; आयुक्त डॉ. बलकवडे यांच्या सूचना

Archana Banage

कोल्हापूर जिल्हय़ात कोरोनाचे 12 बळी, 560 पॉझिटिव्ह

Archana Banage

कोल्हापूर : ऑक्सिजनची ६० टक्के निर्मिती जिल्हयातच

Archana Banage

‘कोरोना’ची धास्ती ठरतेय.. औषधोपचारात अडसर..!

Archana Banage