Tarun Bharat

गडहिंग्लजला चित्रपटगृहात जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई

13 जणांवर गडहिंग्लज पोलीसांत गुन्हा नोंद

प्रतिनिधी/गडहिंग्लज

गडहिंग्लज शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सुभाष चित्रपटगृहात पत्ताचा जुगार आणि पार्टी करणा-यांच्यावर शुक्रवारी दुपारी गडहिंग्लज पोलीसांनी छापा टाकत 13 जणांवर कारवाई केली आहे. लॉकडाउनच्या काळात सर्वात मोठी कारवाई झाल्याने जिल्हयात खळबळ उडाली आहे. या कारवाईत रोख रक्कमेसह 6 दुचाकी, मोबाईल, जेवणाची भांडी आणि जुगाराचे साहित्य असा जवळपास आठ लाखाचा ऐवज जप्त केला आहे.

अधिक माहिती अशी की, शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले सुभाष चित्रपटगृह लॉकडाउनमुळे बंद आहे. याचा फायदा उठवत शहरातील तरूण या चित्रपटगृहात बेकायदेशीररित्या एकत्र येवून जुगार आणि जेवणाची पार्टी करत असल्याची खबर पोलीसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड, सपोनी दिनेश काशिद यांनी सापळा रचून शुक्रवारी दुपारी छापा टाकत 13 जणांवर कारवाई केली. यामध्ये चित्रपटगृहाचे मालक सुमित मनियार, मॅनेजर केप्पांना कोरी (वय 38), राजासाहेब गणीसाहेब मकानदार (वय 42), आयुब गणीसाहेब मकानदार (40), अंकुश वसंतराव दोडमणी (वय 29), राजेंद्र भमाणा भमाणगोळ (वय 31), जमीर सत्तार खलिफा (वय 40), गणेश सुभाष माळी (वय 34), महेश निंगाप्पा भमाणगोळ (वय 44), सुनिल श्रीपती पाटील (वय 44), रमेश मलाप्पा मुदकण्णावर (वय 25), अभिजीत बाळासाहेब ओतारी (वय 34), गिरीष गुरूपाद पट्टणशेट्टी (वय 34, सर्व रा. गडहिंग्लज) यांचा समावेश असून पोलीसांनी या सर्वांना ताब्यात घेतले आहे. पळून गेलेल्यांपैकी एका तरुणास रात्री उशीरा ताब्यात घेतल्याचे समजते. सदर कारवाईत जेवणाचे साहित्य, सिलेंडर, मोबाईल, दुचाकी, रोख रक्कम सुमारे 26 हजार आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. या धाडीत पत्त्याच्या कॅटचे बरेच बॉक्स सापडले. सिगारेटची पाकीटेही मोठय़ा संख्येने सापडली. यावरुन गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी पत्त्याचा जुगार खेळला जात असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. संचारबंदीचे उल्लंघन करून बेकायदेशीररित्या एकत्र येत जुगार खेळत असताना गडहिंग्लज पोलीसांनी कारवाई केली आहे. रात्री उशिरापर्यंत याची नोंद गडहिंग्लज पोलीसात करण्यात येत होती. याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड करत आहेत.

गडहिंग्लज शहराच्या मध्यवस्तीत असणारे सुभाष चित्रमंदिर हे बऱयाच वर्षापासून कार्यरत आहे. लॉकडाऊनमुळे चित्रपटगृह बंद असल्याने याचा फायदा उठवत तेथे पत्त्यांचा जुगार खेळला जात होता. जुन्या सुभाष चित्रपटगृहात पोलिसांनी धाड टाकून जुगार खेळणाऱयांना अटक केले. हीच बातमी शहरात चर्चेची ठरली होती. कारण सुभाष चित्रपटगृह माहीत नाही अशी तालुक्यात व्यक्ती नाही.

Related Stories

सातारा : मृत भ्रृण बाहेर काढणाऱ्या ‘त्या’ कर्मचाऱ्यास केले आत्महत्येपासून परावृत्त

Archana Banage

पूर रोखण्यासाठी संरक्षक भिंत हा उपाय नाही, तर फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना सुचवला ‘हा’ पर्याय

Archana Banage

देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र केली ‘ही’ मागणी

Tousif Mujawar

वैद्यकीय पंढरी मिरज शहरात कोरोनाचा पहिला बळी

Archana Banage

देशात परतीच्या मान्सूनचा धुमाकूळ

datta jadhav

अणदूर पूर्ण क्षमतेने भरले

Archana Banage
error: Content is protected !!