Tarun Bharat

गडहिंग्लज कारखान्याची सुत्रे प्रशासकीय मंडळाच्या ताब्यात

प्रतिनिधी/गडहिंग्लज

गडहिंग्लज तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर प्रशासकीय मंडळ नेमण्यात आले असून आज या मंडळाने कारखान्याची सुत्रे स्विकारली आहेत. विभागीय उपनिबंधक अरूण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली या प्रशासकीय मंडळात जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, जिल्हा विशेष लेखा परिक्षक किरणसिंह पाटील यांचा समावेश आहे. कारखान्याच्या 18 पैकी 12 संचालकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. त्यानंतर प्रशासकीय मंडळ नेमणुकीची चर्चा होती. प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी या राजीनाम्याची दखल घेत आठ दिवसाची मुदत दिली होती. त्याप्रमाणे सदर संचालक मंडळाची नियुक्ती प्रादेशिक सहसंचालक यांनी केली आहे. आज शुक्रवारी सकाळी श्री. काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची सुत्रे घेत कारखान्याच्या विभाग प्रमूखांची बैठक घेवून माहिती घेतली आहे.

Related Stories

तर अशोक चव्हाणांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, सकल मराठा क्रांतीचा इशारा

Archana Banage

कारवर अत्यावश्यक सेवेचे स्टिकर लावून विदेशी बनावटीची दारू विक्री, तिघे संशयित ताब्यात

Archana Banage

पोलीस कॉन्स्टेबल लाचलुचपतच्या जाळ्यात

Abhijeet Khandekar

दहावी-बारावी परीक्षांबाबत लवकरच ‘निकाल’

Patil_p

भाजपचे ‘मिशन टेन प्लस टू’ पण….?

Archana Banage

वांगी येथे शेतकऱ्यांचा महावितरण विरोधात रास्तारोको

Archana Banage