Tarun Bharat

गडहिंग्लज शहराची दोन दिवस होणार नाकाबंदी

शहराबाहेरील नागरिकांना विनाकारण प्रवेश नाही

प्रतिनिधी / गडहिंग्लज

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीस लागल्यानंतर जिल्हा प्रशासनाने 23 मे पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला होता. उद्या सोमवारी राज्यातील कोरोनाच्या नियमाप्रमाणे सकाळी बाजारपेठ सुरू होणार आहे. आठ दिवसासाठी लॉकडाऊन असल्याने उद्या खरेदीसाठी गडहिंग्लज बाजारपेठेत गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुढचे दोन दिवस गडहिंग्लज शहराची नाकाबंदी करण्याचा निर्णय झाला आहे. शहराबाहेरील नागरिकांना अत्यावश्यक कारणासाठीच शहरात सोडण्याचे ठरविण्यात आले आहे.

नगरपालिकेच्या शाहू सभागृहात रविवारी सकाळी व्यापक बैठक पार पडली. डीवायएसपी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, उपनगराध्यक्ष महेश कोरी यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत आठ दिवसाच्या लॉकडाऊननंतर खरेदीसाठी गडहिंग्लजला गर्दी होण्याची शक्यता असल्याने सोमवार आणि मंगळवार अशा दोन दिवसांसाठी शहराबाहेरील नागरिकांना अत्यावश्यक वैद्यकीय कारणाव्यतीरिक्त प्रवेश दिला जाणार नाही. शहरात प्रवेश करणाऱया सर्व रस्त्यावर नाकाबंदी करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी शहरातील कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी `घर ते घर’ सर्वेक्षण करण्याचे ठरवले. प्रतिबंधित व हॉटस्पॉट क्षेत्राचा सर्व्हे दररोज करण्याचा निर्णय झाला. याकरीता नगरसेवकांनी आपल्या प्रभागात लक्ष ठेऊन सहकार्य करावे असे सुचविण्यात आले.

शहरात बाहेरून येणाऱया नागरिकांना 7 दिवसांसाठी संस्थात्मक अलगीकरण करण्यात येणार आहे. तर कोविड चाचणी बंधनकारक करावे. कोरोनाबाधीत व्यक्तीच्या प्रथम संपर्कातील नागरिकांचा शोध घेऊन त्यांची चाचणी करण्याचे ठरविण्यात आले. एखाद्या गल्लीत पाच किंवा पाचपेक्षा अधिक बाधीत रुग्ण सापडल्यास पूर्ण गल्ली प्रतिबंधित करण्यात येणार आहे. गृह अलगीकरण बंद करून संस्थात्मक अलगीकरणातच रुग्णाला ठेवण्याचे ठरविण्यात आले.

शहरातील 60 वर्षावरील अद्यापही लस न घेतलेल्या नागरिकाला प्राधान्य देण्याचे ठरविण्यात आले. शहरातील प्रभागातील नागरिकांनी शहरात इतरत्र न फिरता त्याच प्रभागातील दुकाने, मेडीकल, डॉक्टर्स, भाजीपाला खरेदीसाठी प्राधान्य द्यावे. उपनगराध्यक्ष महेश कोरी यांनी प्रत्यक्ष उद्भवणाऱया समस्या आणि उपाययोजना सूचवल्या यावर चर्चा करण्यात आली. स्वागत व आभार मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी मानले. या बैठकीला नगरसेवक, नगरसेविका, नगरपालिका अधिकारी उपस्थित होते.

गडहिंग्लज शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागात लक्ष देण्याची गरज आहे. प्रभाग समितीने `माझा प्रभाग माझी जबाबदारी’ या दृष्टीकोनातून विचार करून कार्यवाही केल्यास प्रत्येक प्रभाग आणि पर्यायाने शहर लवकर कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करेल असा अशावाद व्यक्त करण्यात आला.

Related Stories

राजाभाऊ भेलचे मालक रविंद्र शिंदे यांच्यावर हल्ला

Abhijeet Khandekar

गोकुळ पश्चिम महाराष्ट्राचा ब्रँड करणार

Archana Banage

शिक्षण महर्षी डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी

Archana Banage

Kolhapur; महावितरणकडून अनोख्या वीज चोरीचा छडा

Abhijeet Khandekar

जिल्ह्यात दुपारी बारा वाजेपर्यंत ७५ पॉझिटिव्ह

Archana Banage

प्राचिन मणकर्णिका कुंडाची जागा पुन्हा देवस्थानकडे

Archana Banage
error: Content is protected !!