Tarun Bharat

गणपतीपुळेत पर्यटकांची गर्दी वाढल्याने वाहतुकीची कोंडी

वार्ताहर/ गणपतीपुळे

गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात शुक्ररवारपासून रविवारपर्यंत भक्तपर्यटकांची मोठी गर्दी झाल्याने या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याचे चित्र दिसत आहे. 

  गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात आपटा तिठा ते बसस्थानक या रस्त्यावर तासातासाने मोठी वाहतुकीची कोंडी झाल्याचे दिसत आहे. रविवारी अनेकवेळा हे चित्र पहावयास मिळत होते. येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पार्किंगमध्ये वाहने फुल झाल्यानंतर मग येथे येणारे भक्तपर्यटक आपल्या चारचाकी गाडय़ा रस्त्याच्या दोन्ही बाजूस पार्क करत असतात. गणपतीपुळे आपटा तिठा ते बसस्थानक हा रस्ता सागरी महामार्ग असल्यामुळे या रस्त्यावर दररोज वरवडे -जयगड-रिळ-उंडी-खंडाळा आदी ठिकाणावरून दररोज वाहनांची ये-जा असते त्यातच आता दिपावलीनिमित्त सुट्टी असल्यामुळे गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात पर्यटकांची गर्दी मोठय़ा प्रमाणात असल्यामुळे त्यांच्याही वाहनांची गर्दी होते. त्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी झाल्याचे दिसत आहे. आपटा तिठा ते बसस्थानक येथे जायला सुमारे एक ते दिड तास पायी चालत जाण्यास लागत आहे. एरव्ही या आपटा तिठा ते बसस्थानक येथे जाण्यास सुमारे 10 ते 15 मिनिटे लागतात. स्थानिक प्रशासनाने येथे असणारे सागरदर्शन पार्किंग लवकर चालू करावे, अशी मागणी सध्या होत आहे.

Related Stories

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नाने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये औषधे दाखल !

Anuja Kudatarkar

मराठा समाज मंडळातर्फे ११ डिसेंबरला वधू -वर मेळावा

Anuja Kudatarkar

गोवा सरकारच्या परवानगीचे पत्र पालकमंत्र्यांनी दाखवावे!

NIKHIL_N

प्रशासन आणि सत्ताधाऱयांत शाब्दिक युद्ध

NIKHIL_N

संगमेश्वर खाडीपट्टयाला वादळी पावसाचा तडाखा, लाखो रुपयांचे नुकसान

Patil_p

कृत्रिम शेल्टरमध्ये नानाविध माशांचा अधिवास

NIKHIL_N