प्रतिनिधी / रत्नागिरी :


गणपतीपुळे समुद्रात बुडताना २ पर्यटकांना वाचवण्यात जीवरक्षक टीमला यश आले आहे. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी समुद्राच्या पाण्याला ओहटी होती. पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात पोहायला उतरलेले दोघे पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. जीवरक्षक आशिष माने, अक्षय माने, महेश देवरुखकर, अनिकेत राजवडकर आणि प्रफुल्ल पाटील यांनी जीवाची बाजी लावत दोघा पर्यटकांना वाचवले.