Tarun Bharat

गणेशोत्सवाची सातारा पालिकेकडून तयारी

Advertisements

प्रतिनिधी/ सातारा

अवघ्या तेहतीस दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सव सोहळ्याच्या तयारीची प्राथमिक बैठक शनिवारी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्या दालनात पार पडली . कृत्रिम तळ्यापासून ते विसर्जन मार्गाच्या दुरुस्तीसह विविध विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली . हद्दवाढीतील भागासाठी यंदा विशेष कुंड व ट्रक्टरची सोय करण्यात येणार असल्याचे उपनगराध्यक्षांनी स्पष्ट केले .

या बैठकीला मुख्याधिकारी अभिजीत बापट, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता दिलीप चिद्रे, तसेच पालिकेच्या सर्व विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते .

करोनाच्या संक्रमण काळात अत्यंत सुरक्षित व पर्यावरण पूरक पध्दतीने गणेशोत्सव सोहळा पार पाडताना करोना प्रतिबंधात्मक नियमांचे कोठेही उल्लंघन होता कामा नये. सर्वानी नियोजनपूर्वक, संघटितपणे या कामामध्ये सक्रीय राहण्याच्या स्पष्ट सूचना मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी केल्या .कृत्रिम तळ्याची निर्मिती, या भागाचे विद्युतीकरण, विसर्जन प्रक्रियेसाठी एकवीस फुटी क्रेनची व्यवस्था, मंगळवार तळे ते बुधवार नाका व्हाया राजवाडा मार्गाच्या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती तांदूळ आळी मोती चौक ते बुधवार नाक्यावरून ते कृत्रिम तळे मार्ग या रस्त्यावर येणाया झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे, लाईफ गार्ड व लाईफ जॅकेटची व्यवस्था, कृत्रिम तळ्यासाठी लागणाया 55 लाख लीटर पाण्याचे नियोजन, कृत्रिम तळ्याच्या भोवती बॅरिकेटिंग करणे, विसर्जन मार्ग व कृत्रिम तळ्यावर सीसीटीव्हीची व्यवस्था करणे, मोती तळयांची व भवानी तलावाची स्वच्छता , शहरात ठिकठिकाणी निर्माल्य कुंडांची व्यवस्था करणे इं विविध मुद्यांवर तपशीलवार चर्चा करण्यात आली . या कामांच्या नियोजनासाठी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या नेतृत्वाखाली चार स्वतंत्र पथके नेमून त्यांना कामाच्या जवाबदाया स्पष्ट करण्यात आल्या आहेत . यामध्ये काही जवाबदारी अभियंता दिलीप चिद्रे यांच्यावर सोपवण्यात आली आहे .

या संदर्भात बोलताना उपनगराध्यक्ष मनोज शेंडे म्हणाले, ” सातारा शहरात करोना संक्रमणाच्या प्रतिबंधासाठी सातारकरांनी फार गर्दी न करता पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जावा यासाठी पालिका प्रयत्नशील आहे . हद्दवाढीच्या भागात माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने निर्माल्य व विसर्जन कुंड व ट्रक्टरची सोय केली जाणार आहे . सातारकरांनी व गणेश मंडळांनी चार फुटी गणपतीच्या मूर्ती बसवाव्यात असे आवाहन शेंडे यांनी केले . शाडू मातीचे गणपती विक्री करणाया स्टॉल्सला विशेष सवलत देण्यात येणार व कमीत कमी खर्चात काटकसर करून गणेशोत्सव सोहळा सातारा पालिका पार पाडणार असल्याचे उपनगराध्यक्षांनी सांगितले .

Related Stories

वहागावात युवकाचा खून करून मृतदेह शेतात पुरला

Patil_p

भाजी विक्रेत्यावर पोलीसांची कारवाई

Patil_p

परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थी आणि पालक सुसंवाद गरजेचा…

Abhijeet Khandekar

आर्मीतील व्यक्तीचा अवघ्या 8 वर्षीय मुलीवर अतिप्रसंग

Amit Kulkarni

कोरोना होऊ नये याची काळजी घ्या : आ. शिवेंद्रसिंहराजे

Abhijeet Shinde

साताऱयात जाणवला काश्मिरचा फिल

Patil_p
error: Content is protected !!