Tarun Bharat

गणेशोत्सवात चाकरमान्यांना विनापास येण्यास परवानगी नाही

प्रतिनिधी/ रत्नागिरी

गणेशोत्सवासाठी जिह्यात येण्यासाठी पासची आवश्यकता असून विनापास कुणालाही जिह्यात येता येणार नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सध्या मुंबईहून येणाऱया चाकरमान्यांच्या कशेडी घाटात रांगा लागल्या असून घाटात वादाचे प्रसंग घडत आहेत. रविवारी खेड येथे खोटा पास असलेल्या वाहनाला देखील पकडण्यात आले आहे. मात्र सध्या तरी विनापास जिह्यात येण्याचा कोणताही निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला नसल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने दिली.

  गणेशोत्सवाला काही दिवस उरले असताना रविवारपासून रत्नागिरी जिह्यात मुंबईतून येणाऱया चाकरमान्यांच्या गाडय़ांची गर्दी सुरू झाली आहे. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर विनापास जिह्यात प्रवेश करणाऱया वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनांकडून देण्यात आल्या आहेत, मात्र अजूनही शासनाकडून चाकरमान्यांसंदर्भात कोणतीही नियमावली स्पष्ट करण्यात आलेली नाही. यामुळे याविषयी चाकरमान्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. खोटे पास दाखवून जिह्यात प्रवेश करू पाहणाऱयांवर प्रशासनाकडून रविवारी कारवाई करण्यात आली.  त्यामुळे चाकरमान्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

Related Stories

वाहून गेलेला संसार उभारताना महिलांची कसरत

Patil_p

पुराच्या पाण्यात पोहणे आले अंगाशी, दोघांचा बुडून मृत्यू

Archana Banage

Ratnagiri; परशुराम घाट 1 ऑगस्टपासून वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला होण्याची शक्यता

Abhijeet Khandekar

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष प्रा. संदीप गवस यांना पितृशोक

Anuja Kudatarkar

तौक्ते चक्रीवादळाने गती बदलल्याने रत्नागिरी जिल्हयात मोठे नुकसान

Archana Banage

रत्नागिरीत 24 तासात 28 नवे रुग्ण

Archana Banage