Tarun Bharat

गणेशोत्सवानिमित्त सांगलीत पोलिसांचे संचलन

Advertisements

प्रतिनिधी/सांगली

कोरोनाचा हाहाकार अद्यापही संपलेला नाही. त्यामुळे गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने करण्याचे आदेश राज्यप्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार सांगली शहरात पाचव्या दिवशी कोणीही मिरवणुक काढू नये यासाठी सांगली शहरातील मुख्य बाजारपेठेसह खणभागातून पोलिसांनी  संचलन केले. सांगली शहरात दुपारनंतर काही भागात जमावबंदीही जाहीर  करण्यात आली आहे. तसेच सांगली संस्थानच्या गणपतीचेही साधेपणाने विसर्जन करण्यात येणार आहे.

सांगली शहरात पाचव्या दिवशी संस्थानची मिरवणूक पाहण्यासाठी मोठयाप्रमाणात गणेश भक्त येत असतात. पण सध्या कोरोनाचा काळ सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत सुरक्षिततेचे नियम व सोशल डिन्स्टिसिंगचा फज्जा उडू शकतो त्यामुळे सांगली शहरातील काही भागात मंगळवारी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर सांगली शहरात पोलिसांनी संचलन केले.

Related Stories

अधिवेशनात घुमला पडळकरांचा ढोल

Abhijeet Shinde

मिरजेच्या सुपुत्राची अवकाश भरारी

Abhijeet Shinde

महावितरणच्या अनागोंदी कारभारने सामान्य जनता हैराण

Abhijeet Shinde

परीक्षेला विद्यार्थी जीवनातील उत्सव बनवा : रघुवीर रामदासी

Abhijeet Shinde

वीजबील दुरुस्ती नाही, तर बील भरणार नाही

Sumit Tambekar

सांगलीत राष्ट्रवादीचे जिल्हा शहर उपाध्यक्ष पाटोळे यांचा खून

Abhijeet Shinde
error: Content is protected !!