Tarun Bharat

गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची डागडुजी करा!

देवगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

प्रतिनिधी / देवगड:

देवगड तालुक्यातील अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अख्त्यारीत असलेल्या रस्त्यांची दुरावस्था झाली असून वाहन चालविणे कठीण बनले आहे. काही दिवसांवर गणेशोत्सव असल्याने रस्त्याची रस्त्यांची तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी देवगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राष्ट्रवादीचे नेते नंदकुमार घाटे यांच्या नेतृत्वाखाली देवगड जि. प. बांधकाम विभागाला भेट देऊन करण्यात आली.

यावेळी तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव, तालुका सरचिटणीस शरद शिंदे, चंद्रकांत पाळेकर, दिलीप रुमडे, नाना मुणगेकर, उदय रुमडे, दशरथ लोके, विनायक जोईल, बाबू वाळके, नीलेश पेडणेकर आदी उपस्थित होते. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अलीकडेच जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठी दैनावस्था झाली आहे. ग्रामीण भागात जाणारे जिल्हा परिषदेच्या मालकीचे मुख्य रस्ते पूर्णतः खराब झाले असून रस्त्यांची ठिकठिकाणी चाळण झाली आहे. जोराच्या पावसामुळे ग्रामीण भागातील रस्ते पूर्णतः धुपून गेले असल्याने नागरिकांना वाहन चालवणे अत्यंत कठीण बनले आहे. गणेशोत्सव जवळ येत असल्याने गणेश भक्त डोक्यावरून तसेच वाहनातून गणेशमूर्ती आपापल्या घरी नेतात. मात्र, रस्त्यांची खराबी झाली असल्याने मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी तातडीने रस्त्याची दुरुस्ती आवश्यक आहे. रस्त्यातील खड्डे बुजवून रस्त्यांची तातडीने डागडुजी करण्यात यावी, मागणी करण्यात आली आहे.

Related Stories

नियमांचे पालन न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करा!

NIKHIL_N

तळगाव-सोनवडे-कर्ली नदीत चोरटा वाळू व्यवसाय तेजीत!

NIKHIL_N

दारू माफियांवर धडक कारवाई?

NIKHIL_N

बांद्यात एकमूठ धान्य गरिबांसाठी उपक्रम

NIKHIL_N

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरला मारहाण

NIKHIL_N

महिलांनी प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया योजनेचा लाभ घ्यावा

Anuja Kudatarkar