Tarun Bharat

गणेशोत्सवाबाबत चर्चा करण्यासाठी 17 रोजी बैठक

Advertisements

प्रतिनिधी /  बेळगाव

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्मयता असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे गणेशोत्सव कोणत्या प्रकारे साजरा करावा याबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत कोणताच ठोस निर्णय घेण्यात आला नाही. याबाबत चर्चा करण्यासाठी  शनिवार दि. 17 रोजी दुपारी 4 वा. बैठक आयोजित करण्याचे ठरले.

गणेशोत्सव साधेपणाने व कोरोना नियमावलीचे पालन करून साजरा करण्याबाबत चर्चा करण्यासाठी गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱयांची बैठक गुरूवारी आयोजित केली होती. यावेळी विविध गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सव साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. पण सर्व गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱयांना विश्वासात घेऊन ठोस निर्णय घेण्याचे ठरले. तसेच प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱयांची बैठक घेऊन गणेशोत्सव साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात येईल. त्यानंतर मंडळाच्या वतीने महामंडळाकडे सूचना मांडण्यात येतील असे काही मंडळाच्या पदाधिकाऱयांनी सूचविले. याकरिता पुन्हा बैठक आयोजित करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रणजित चव्हाण – पाटील, उपाध्यक्ष प्रकाश मरगाळे, सतिश गौरगोंडा, मदन बामणे, चिटणीस गणेश दड्डीकर, महादेव पाटील, शुभम शेळके, सागर पाटील, आदिंसह महामंडळाचे पदाधिकारी व गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष उपस्थित होते. 

Related Stories

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार काही सरकारी कार्यालये सुवर्णसौधमध्ये

Patil_p

दौडच्या माध्यमातून सादर केला देखावा ः सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद

Patil_p

निप्पॉन पेंट्सच्या नव्या दालनाचे थाटात उद्घाटन

Omkar B

बेळगाव जिल्हयातील आणखी 9 जणांना कोरोनाची लागण

Rohan_P

साधना क्रीडा केंद्र चषक कडोली संघाकडे

Amit Kulkarni

या महिन्यात विजेचे बील मिळणार एसएमएसद्वारे

Patil_p
error: Content is protected !!