Tarun Bharat

गणेशोत्सव साजरा करण्यावरुन दोन गटात मारहाण

वार्ताहर/ संगमेश्वर

मंदिरात गणेशोत्सव साजरा करण्यावरुन संगमेश्वरजवळच्या असुर्डे पाताडेवाडी येथील दोन गटात झालेल्या वादावादीचे पर्यावसान मारहाणीत झाले. गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच दोन गटात झालेल्या मारहाणीत दोन्ही गटातील 52 जणांवर संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत.

  या प्रकरणी विष्णू धर्मा पाताडे यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 43 वर्षापूर्वी मौजे असुर्डे पाताडेवाडी गणेश सेवा मंडळ स्थापन करण्यात आले होते. यानंतर मंडळात 2019 साली धार्मिक कार्यक्रमात वाद झाल्याने दोन मंडळे स्थापन करण्यात आली. या मंडळापैकी रमेश बाळू पाताडे हे एका मंडळाचे अध्यक्ष आहेत तर विष्णू धर्मा पाताडे दुसऱया मंडळाचे अध्यक्ष आहेत. या दोन मंडळामध्ये माघी गणेशोत्सव साजरा करण्यामध्ये वाद सुरु होते. त्यावेळी गावातील तंटामुक्त समितीत 26 जानेवारी 2021 च्या सभेमध्ये एकावर्षी एका पार्टीने माघी गणेशोत्सव साजरा करावा तर दुसऱया वर्षी दुसऱया मंडळाने उत्सव साजरा करावा, असे ठरले होते. परंतु या सभेमध्ये विष्णू धर्मा पाताडेंचे तीन सदस्य उपस्थित होते. तसेच हा निर्णय लेखी स्वरुपात झाला नव्हता.

  13 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 च्या दरम्यान विष्णू पाताडे यांच्या पार्टीतील मंडळाचे सहकारी 15 फेबुवारी रोजी माघी गणेशोत्सवानिमित्त गणेश मंदिरात गेले असता यातील रमेश पाताडे हे रवींद्र सोमा पाताडे व हर्षद प्रसाद खापरे यांची सभा घेत असताना विष्णू पाताडेंनी रमेश पाताडे यांना माघी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी तुम्हाला परवानगी देण्याबाबत तंटामुक्तीचे लेखी पत्र आहे काय, असे विचारले. यावेळी तेथे उपस्थित असलेले यशंवत पाताडे यांनी तुम्हाला लेखीच पाहिजे काय तोंडी चालत नाही, असे बोलून यातील मंगेश पाताडे येंना लाथ मारली तर रमेश पाताडे, रवींद्र भाताडे, तानाजी घडशी, यशवंत पाताडे, कृष्णा घडशी, हर्षद खापरे, प्रसाद खापरे, चंद्रकांत घडशी, तुषार घडशी, अजय मांडवलकर, तेजस मांडवलकर, आदर्श भाताडे, राकेश भाताडे, आकाश भाताडे, सुरेश भाताडे, महेश डांगे, दीपक पाताडे, दिलीप डांगे, प्रदीप डांगे, प्रणव डांगे, किरण पाताडे, अरविंद पाताडे, प्रवीण पाताडे, प्रकाश पाताडे, विजय पाताडे, वैभव पाताडे, वसंत पाताडे, अनंत पाताडे, यशवंत पाताडे, संतोष पाताडे, चंद्रकांत मांडवकर, सरिता घडशी, सुगंधा घडशी, प्रतिभा डांगे, रुपाली मांडवकर, वेदिका भाताडे, चेता घडशी, अश्विनी पाताडे, माधवी पाताडे यांनी गैरकायदा जमाव केला. याप्रसंगी दोन्ही गटात झटापट झाली. या झटापटीत एकमेकांना हाताच्या थापटांनी व लाथांनी मारहाण केली. झालेल्या झटापटीत निर्मला पाताडे, सुरेश डांगे, रत्नू पाताडे, अक्षय पाताडे यांना मारहाण होवून दुखापती झाल्या. तसेच मंगेश रत्नू पाताडे यांच्या गळय़ातील सोन्याची चेन गहाळ झाली आहे.

Related Stories

रत्नागिरी तालुका काँग्रेस बैठकीत अंतर्गंत वाद उसळले

Omkar B

केवायसीच्या बहाण्याने महिलेला 90 हजाराचा गंडा

Patil_p

शिक्षक बदल्यांचा तिढा अद्यापही कायम?

Patil_p

कशेडी घाटातील 730 मीटर अंतराचा भुयारी मार्ग पूर्णत्वास

Patil_p

मंडणगडचा वीज पुरवठा खंडित, पाणी व्यवस्था कोलमडली

Patil_p

Ratnagiri : महामार्गाचे काम पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली नको; राजापुरवासीयांची मागणी

Abhijeet Khandekar