Tarun Bharat

गणेश मूर्तींच्या उंचीवर निर्बंध आल्याने कुंभार व्यावसायिक अडचणीत

प्रतिनिधी / कसबा बीड

गणेश मूर्तींच्या उंचीवर निर्बंध आल्याने करवीर तालुक्यातील कसबा बीड, आरे, शिरोली दुमाला येथील कुंभार व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्याही गणेशोत्सव सोहळ्यावरही प्रशासनाचे कडक निर्बंध असल्याने दुसऱ्या वर्षी गौरी-गणपतीचा सण साध्या पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे. घरगुती गणपती मुर्ती दोन तर सार्वजनीक गणेश मुर्ती चार फुट या नियमामुळे ग्रामीण भागातील तरुण मंडळामध्ये शांतता आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव आणि गणेशोत्सवावर शासनाने कडक निर्बंध जारी केल्याने करवीर तालुक्यातील कुंभार व्यवसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहे.

महापूर, कोरोना या संकटाना सलग तीन वर्ष कुंभार व्यावसायिकांना सामोरे जावे लागले आहे. सध्या असणाऱ्या कोरोना महामारीचा आर्थिक फटका मुर्तीकारांना बसला आहे. कोरोनाबरोबरच वाढत्या महागाईच्या काळात सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सव सोहळा साधेपणे साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव सोहळ्यात कडक निर्बंधामुळे ८० टक्के मंडळांनी यावर्षी सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. फक्त ४ फुटी गणेश मुर्तीची प्रतिस्थापना करण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेशमुर्ती बनविण्यासाठीच्या ऑडरही यंदा तरुण गणेश मंडळांकडून कुंभार काम करणाऱ्यांना मिळालेल्या नाहीत. ग्रामीण भागातील कुंभार व्यवसायिक आर्थिक दृष्टीकोनातून अडचणीत आले आहेत.

कोरोना महामारीमुळे याही वर्षीचा गणेशोत्सव सोहळा ग्रामीण भागात अल्प प्रमाणात साजरा होणार असल्याने कुंभार समाजाने गणेशमुर्ती कमी प्रमाणात बनविण्याचे निर्णय घेतले आहेत. घरगुती गणपती बनविले जात आहेत. 

Related Stories

बेकरीच्या काऊंटरमधून रोकड लंपास

Archana Banage

गौराई वनस्पती झाली दुर्मिळ

Archana Banage

आमदार आसगावकर यांच्या विजयाने कोल्हापूरचा सन्मान – छ. शाहू महाराज

Archana Banage

आई जेऊ घालेना… बाप थारा देईना

Archana Banage

Sangli; भारत केसरी माऊली जमदाडेकडून महाराष्ट्र मदने घिस्सा डावावर चितपट

Abhijeet Khandekar

ईएसआयचे चार सेवा दवाखाने मंजूर

Archana Banage