Tarun Bharat

‘गन्स अँड गुलाब्स’मध्ये राजकुमार राव

Advertisements

चित्रपटातील व्यक्तिरेखेचा फर्स्ट लुक प्रदर्शित

राजकुमार रावने अभिनयाद्वारे प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळविले आहे. राजकुमार राव आता पहिल्यांदाच नेटफ्लिक्सच्या सीरिजमध्ये दिसून येणार आहे. राज आणि डीके यांची आगामी वेबसीरिज ‘गन्स अँड गुलाब्स’चा फर्स्ट लुक समोर आला आहे. या सीरिजच्या पोस्टरमध्ये राजकुमार राव शीतपेयाची बाटली हातात धरून असल्याचे दिसून येते.

या सीरिजमध्ये 90 दशकातील पार्श्वभूमी दर्शविण्यात आली आहे. क्राइम, लव्ह आणि धमाकेदार पंचलाइनने भरलेल्या एका रोमांचक साहसी सीरिजसाठी तयार रहा. राज अँड डीकेची ही सीरिज लवकरच भेटीला येणार आहे असे राजकुमार रावने नमूद केले आहे. राजकुमार रावचे हे पोस्टर पाहून विक्की कौशलने ‘चॅम्प’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर राजकुमारची पत्नी पत्रलेखा, भूमी पेडणेकर आणि नर्गिस फाकरीसह अनेक कलाकारांनी कॉमेंट केली आहे.

राजकुमार आणि दिग्दर्शक राज अन् डीके दुसऱयांदा एकत्र आले आहेत. यापूर्वी ‘स्त्राr’ हा त्यांचा चित्रपट यशस्वी ठरला होता. ही जोडी नेटफ्लिक्स सीरिजसाठी पुन्हा एकत्र येत असल्याने चाहते उत्सुक आहेत. राजकुमार सध्या अनुभव सिन्हा यांचा ‘भीड’, नेटफ्लिक्सची सीरिज ‘मोनिका ओ माय डार्लिंग’, धर्मा प्रॉडक्शनची ‘मिस्टर अँड मिसेस माही’ आणि एका हिंदी रिमेकमध्ये काम करत आहे.

Related Stories

मुक्ता बर्वे पहिल्यांदाच करणार काजोलसोबत काम

Abhijeet Shinde

रियाच्या अडचणीत वाढ; न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली

Rohan_P

कतरिनाच्या चित्रपटाची संजय लीला भन्साळी करणार निर्मिती

tarunbharat

बॉलिवूडला मी परवडणारा नाही

Patil_p

NationalFilmAwards: कंगना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर मनोज वाजपेयी आणि धनुष ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेते

Abhijeet Shinde

‘टोटल हुबलाक’मधून मोनालीसा छोटय़ा पडद्यावर

Patil_p
error: Content is protected !!