Tarun Bharat

गरजूंना होणार अडीच हजार जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप

प्रतिनिधी/बेळगाव :

देशात कोरोना संकटाने हाहाकार माजविला आहे. त्यामुळे समाजातील गोर-गरीब जनतेचे खाण्यापिण्याविना हाल होत आहेत. अशावेळी समाजाच्या विविध स्तरातून मदतीचा ओघ सुरूच आहे. या मदतीसाठी अनेकांचे योगदान मिळत आहे. आमदार अनिल बेनके यांनी तब्बल अडीच हजार जीवनावश्यक वस्तूंचे किट तयार केले असून गुरुवारपासून या किटचे वाटप सुरू करण्यात आले आहे. 

महांतेशनगर येथील महांत भवनमध्ये एकूण पाच हजार जीवनावश्यक वस्तूंचे किट तयार होतील इतके साहित्य एकत्रित करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी  मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत मारवाडी समाज, एपीएमसी मार्केट, रविवार पेठ, महांत भवन, मोबाईल ऍप, जैन दिगंबर, जितो आदींची मदत मिळाली आहे. या किटमध्ये बटाटे, कांदा, साखर, तेल पाकीट, मीठ, बिस्किट आदी वस्तूंचा समावेश आहे. या सर्व किटचे वाटप बेळगाव उत्तर मतक्षेत्रातील गोर-गरीब जनतेला करण्यात येणार आहे. संकटात सापडलेल्या गरजूंना एकूण 12 हजार कीटचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

लहान मुले-विद्यार्थ्यांची काळजी घ्या

Patil_p

ड्रेनेजवाहिन्या घालण्याच्या कामामुळे पाणीपुरवठा विस्कळीत

Amit Kulkarni

बसथांब्याच्या विकासाकडे लक्ष देणार का?

Amit Kulkarni

शिक्षक अजय काळे यांची बदली करा

Rohit Salunke

दौडमधून होणार सुवर्ण सिंहासनाची जागृती

Patil_p

जितो बेळगावच्या अध्यक्षपदी सुनील कटारिया

Patil_p