Tarun Bharat

गरजूंसाठी बुक केले पूर्ण हॉटेल

ब्रिटनमध्ये राहणाऱया दांपत्याकडून शरणार्थीना मोठी मदत

मूळचे पोलंडमधील आता ब्रिटनमध्ये राहणाऱया एका दांपत्याने अनोखा पुढाकार घेतला आहे. या  दांपत्याने पोलंडमध्ये 180 खोल्यांचे हॉटेल भाडेतत्वावर घेतले आहे. या हॉटेलात आता रशिया-युक्रेन युद्धातील शरणार्थी राहणार आहेत. या शरणार्थींना आणण्यासाठी या दांपत्याने 48 आसनी बसची मदत घेतली आहे.

पतीचे नाव जॅकब गोलाटा आणि तर पत्नीचे नाव गोसिया आहे. 2004 साली ते ब्रिटनमध्ये स्थायिक झाले होते. दोघांनी मिळून बायडगोस्कझनजीक पार्क हॉटेल ट्रायस्कस्झन भाडेतत्वार घेतले आहे. आतापर्यंत 149 जण युक्रेन पार करून येथे पोहोचले आहेत. लोकांना योग्य वेळेवर मदत मिळत नव्हती यामुळे लवकरात लवकर पाऊल उचलू इच्छित होतो असे 42 वर्षीय जॅकब यांनी म्हटले आहे.

जॅकब हे एचएस2 रेल्वे प्रकल्पात लॉजिस्टिक मॅनेजर म्हणून करतात. पत्नीसोबत उत्तर लिंकनशायरमध्ये राहत आहेत. त्यांची पत्नी तेथे पोलीस अधिकारी आहे. या दोघांनी पोलंडमध्ये धाव घेत युक्रेनच्या शरणार्थींना मदत करण्यास सुरुवात केली आहे. शरणार्थींना राहण्यासाठी समस्या होत असल्याने त्यांनी पूर्ण हॉटेलच भाडेतत्वावर घेतले आहे. याकरता त्यांना ब्रिटनमधील स्वतःच्या बॉसची पूर्ण मदत झाली आहे. बॉसने रक्कम गोळा करून जॅकब यांच्या या कार्यासाठी उपलब्ध केली आहे.

Related Stories

इस्लामिक दहशतवादाच्या विरोधामधील फ्रान्सची मोहीम थांबणार नाही!

Patil_p

अमेरिका पुन्हा गोळीबाराने हादरले

Patil_p

पंजशीरमध्ये तालिबानच्या ७०० दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा

Archana Banage

साखळी बॉम्बस्फोटात 2 ठार; अवघ्या 100 मीटरवर होता भारतीय संघ

datta jadhav

अमेरिकेत मंकीपॉक्सचे 200 रुण -प्रशासन झालं सतर्क

Patil_p

कोरोनाचा मूळ स्रोत कधीच समजणार नाही!

Patil_p