ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
गरीबांवर हल्ला, दलितांवर हल्ला, शेतकऱ्यांवर हल्ला, लोकशाहीवर हल्ला हाच खरा भाजपचा चेहरा आणि चरित्र आहे. याविरोधात काँग्रेस निकराने लढा देणार अशी टीका काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी केली आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट करत व्हिडीओपुढे या ओळी लिहिल्या आहेत.


या व्हिडीओत काही लोकांना पोलीस अमानुषपणे मारत आहेत. जो कुणी मधे पडेल त्यालाही फटके देत आहेत असं दिसून येतंय. हा व्हिडीओ पोस्ट करुन त्यांनी मध्यप्रदेश सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजपचा हा खरा चेहरा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मध्य प्रदेशातील गुना येथे अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी शेतकरी दाम्पत्याला मारहाण केली आहे. त्यानंतर या दाम्पत्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेवरून प्रियांका गांधी यांनी भाजपवर टीका केली आहे.