Tarun Bharat

गर्दीअभावी ट्रम्प यांची दुसरी सभा रद्द

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

अमेरिकेत येत्या 3 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे. निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असतानाच सभेला गर्दी जमत नसल्याने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दुसरी सभा रद्द करावी लागली आहे. ट्रम्प यांचे प्रचारप्रमुख टीम मरटॉग यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

ट्रम्प यांच्या ओक्‍लाहोमा येथील पहिल्या प्रचारसभेला गर्दी नसल्याने टुलसा येथे होणारी दुसरी सभा रद्द करण्यात आली आहे. ओक्‍लाहोमा येथील सभेसाठी 19 हजार क्षमता असलेले स्टेडियम असताना 10 लाख लोकांनी तिकिटाची मागणी केली होती. त्यामुळे स्टेडियम कमी पडेल की काय, असे वाटत होते. पण या सभेला गर्दी जमली नाही. पहिल्या सभेला कमी उपस्थिती असल्याने टुलसा येथे होणारी दुसरी सभा रद्द करण्यात आल्याचे मरटॉग यांनी सांगितले. 

दरम्यान, ट्रम्प यांच्या कार्यपद्धतीमुळे अमेरिकेतील लोक नाराज आहेत. त्यातच कोरोनामुळे वाढलेली मृतांची संख्या, बेरोजगारी आणि जॉर्ज फ्लॉईड या आफ्रिकन वंशाच्या कृष्णवर्णीय नागरिकाच्या हत्येनंतरचे हिंसक आंदोलन यामुळे राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक ट्रम्प यांच्यासाठी सोपी राहिली नाही. अमेरिकेतील नागरिकांमध्ये ट्रम्प यांच्याविषयी असंतोष वाढत असल्याने ट्रम्प यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. 

Related Stories

चीनचे ‘सुखोई-35’ विमान तैवानकडून टार्गेट

Patil_p

ऑक्सफर्डची लस ठरणार 90 टक्के प्रभावी

Omkar B

थानवी अमेरिकेतील सर्वात कमी वयाची लेखिका

Patil_p

पाकिस्तानी अधिकाऱयाच्या मुलीची हत्या

Amit Kulkarni

कोविड १९ बूस्टर डोस विनामूल्य

Rohit Salunke

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

datta jadhav