Tarun Bharat

गर्दी जमवल्याने ‘सपा’ला नोटीस

कोविड नियमांचे उल्लंघन : 2,500 कार्यकर्त्यांवर गुन्हे

लखनौ / वृत्तसंस्था

कोविड-19 नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी समाजवादी पक्षाच्या (एसपी) सुमारे 2,500 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच आता या प्रकरणात निवडणूक आयोगाने लक्ष घालत गर्दी जमवल्याप्रकरणी समाजवादी पक्षाला नोटीस पाठवली असून चोवीस तासात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच गौतम पल्ली पोलीस स्थानकाच्या प्रभारीला निलंबित केले असून दोन वरि÷ पोलीस अधिकाऱयांकडून स्पष्टीकरण मागितले आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर करतानाच् निवडणूक आयोगाने 15 जानेवारीपर्यंत सार्वजनिक रॅली, रोड शो आणि कॉर्नर सभांवर बंदी घालताना कडक सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. मात्र, शुक्रवारी समाजवादी पक्षाच्या कार्यालयात काही नेत्यांच्या पक्षप्रवेशावेळी जमलेल्या गर्दीमुळे आयोगाने कठोर निर्णय घेत संबंधितांविरोधात गुन्हा नोंदवला. निवडणुकीच्या रणधुमाळीत झालेल्या या पहिल्याच मोठय़ा कारवाईची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.

कोविड नियमांवरील आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल लखनौ जिल्हा दंडाधिकाऱयांच्या अहवालाची दखल घेत, गौतम पल्ली पोलीस स्थानकाचे प्रभारी दिनेश सिंग बिश्त यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे निर्देश जारी करण्यात आल्याची माहिती उत्तर प्रदेशमधील मुख्य निवडणूक अधिकाऱयांच्या कार्यालयाकडून शनिवारी देण्यात आली. लखनौचे पोलीस आयुक्त डी. के. ठाकूर यांनीही याबाबतच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच कोविड-संबंधित नियमांवरील निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार एसपी कार्यालयात कोविड नियमांचे उल्लंघन करून मोठय़ा प्रमाणात जमाव जमल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही अधिकाऱयांनी सांगितले. माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य आणि धरमसिंग सैनी यांच्यासह भाजपचे पाच आमदार आणि अपना दल (सोनेलाल) मधील एकाने समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पक्षप्रवेश केला. याप्रसंगी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. भारतीय दंड संहिता कलम 188 (सूचनांचे उल्लंघन), 269 (रोगाचा संसर्ग पसरवणे), 270 (संसर्ग पसरवून इतरांचा जीव धोक्मयात घालणे) आणि 341 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

आसाम मुख्यमंत्रिपदाचा तिढा आज सुटणार ?

Patil_p

मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्ली-हरियाणासह 30 ठिकाणी ईडीची छापेमारी

datta jadhav

पश्चिम बंगालमधील राजकीय वाप्युद्ध सुरूच

Patil_p

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान रुग्णालयात दाखल

Tousif Mujawar

हॉलतिकीट उद्यापासून मिळणार – शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांची माहिती

Patil_p

हिमाचलमध्ये भाजपकडून नव्या चेहऱयांना संधी

Amit Kulkarni