Tarun Bharat

गर्भवतींनाही लवकरच कोरोनाची लस

-जिह्यातील 68 हजार 347 महिलांना दिली जाणार लस

-कोविशिल्ड,कोव्हॅक्सिन लसीचा होणार वापर, –तालुकास्तरावर लसीकरणासंदर्भात दिले जाणार प्रशिक्षण

कृष्णात चौगले/कोल्हापूर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्याचा प्रयत्न सुरु असताना आरोग्य विभागाकडून आता तिसऱ्या लाटेची तयारी सुरु आहे. अधिकाधिक लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करून त्यांना संरक्षीत केले जात आहे. शासन निर्णयानुसार आता गर्भवती महिलांनाही कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनची लस दिली जाणार आहे. या लसीकरणासंदर्भात जिल्हा पातळीवरील प्रशिक्षण पूर्ण झाले असून आता तालुका पातळीवर सुरु आहे. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील आठवडÎापासून जिह्यातील 68 हजार 347 गर्भवतींना टप्प्याटप्प्याने कोरोना लस दिली जाणार आहे.

जिह्यातील 78 गावांमध्ये 45 वर्ष आणि त्यापुढील वयांच्या नागरिकांचे 100  टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. तिसऱया लाटेमध्ये लहान मुलांना मोठÎा प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होणार असल्याचा अंदाज वर्तवला असल्यामुळे एक वर्षाच्या आतील बालकांना कोरोना आणि न्युमोनियापासून सुरक्षित ठेवण्यासाठी `न्युमोकॉकल’ लस देण्याचे नियोजन सुरु आहे. आता गर्भवती महिलांनाही कोरोना लस देण्याच्या शासनाने सूचना दिल्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून लसीकरणाचे नियोजन सुरु आहे. यानुसार जिह्यातील सर्व शासकीय व गरोदरपणाशी संबंधित खासगी हॉस्पिटल्समधील सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व आशा, अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण होणार आहे.

वैद्यकीय तज्ञांच्या परवानगीने लसीकरण

गर्भवती महिलांना लस देण्यासाठी आजतागायत शासनाची परवानगी नव्हती. पण आता वैद्यकीय तज्ञांनी परवानगी दिली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गरोदर मातांना लस दिली जाणार आहे. यासाठी आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचाऱयांमार्फत घरोघरी जाऊन लस घेण्याबाबत समुपदेशन केले जाणार आहे. लस कोठे व कधी मिळेल याबाबत गरोदर मातांना सांगितले जाणार आहे. –डॉ. फारुख देसाई, माता बाल संगोपन अधिकारी, जि.प.कोल्हापूर

गर्भवती महिलांची तालुकानिहाय संख्या

तालुका              गर्भवती महिला संख्या

आजरा               1850

भुदरगड              2710

चंदगड               3181

गडहिंग्लज            3567

गगनबावडा           642

हातकणंगले           8124

कागल               4134

करवीर               8777

पन्हाळा               4604

राधानगरी             3587

शाहूवाडी              3239

शिरोळ                5256

जिल्हा (ग्रामीण)         49659

नगरपालिका क्षेत्र         10156

जिल्हा एकूण            68347

सर्व गर्भवती महिलांचे लसीकरण इतर नागरीकांप्रमाणेच आहे. त्याबाबतची माहिती देऊन त्यांचे समुदेशन केले जाणार आहे. गरोदर मातांचे रजिस्टर, एमसीपी कार्डवर लसीकरणाची नोंद घेतली जाणार आहे. तसेच लसीकरणानंतर पुढे त्यांना कोणता त्रास होतो काय ? याबाबत आरोग्य कर्मचाऱयांकडून दक्षता घेतली जाणार आहे.

Related Stories

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा प्रयत्न

Archana Banage

शिरोळमध्ये तीन पानी जुगार अड्ड्यावर धाड; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त चौघे ताब्यात

Archana Banage

कोल्हापुरात शिवसेना आक्रमक; प्रकाश अबीटकरांच्या घरावर हल्लाबोल

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : टोप अतिक्रमणे न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयाच्या आदेशानेच कारवाई करणार

Archana Banage

बांधकामचे कर्मचारी पाच वाजताच गायब

Archana Banage

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना होम पीचवरच आव्हान; राजीनाम्याची मागणी

Archana Banage