Tarun Bharat

गलवान खोऱ्यात हल्ल्याची योजना आखणाऱ्या चिनी अधिकाऱ्याची बदली

ऑनलाईन टीम / बीजिंग : 

पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारतीय सैन्यावर हल्ला करण्याची योजना आखणाऱ्या चीनच्या वेस्टर्न थिएटरचे कमांडर लेफ्टनंट जनरल झाओ झोंगकी यांची बदली करण्यात येणार आहे. त्यांच्या बदलीची तयारी झाली असून, त्यांची जागा लेफ्टनंट जनरल ल्यू जैनली घेतील.

झोंगकी यांनी वीस वर्षाहून अधिक काळ या भागात काम केले आहे. भारतीय सैन्यावर हल्ला करून लडाख ताब्यात घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नजरेत स्वत:ला सिद्ध करुन झोंगकी सेंट्रल मिलिट्री कमीशनमध्ये व्हाईस चेअरमन बनू इच्छित आहे. 

झोंगकीला व्हिएतनाम युद्धाचा अनुभव आहे. 2017 मध्ये डोकलाम वादावेळी वेस्टर्न थिएटर कमानचा तो कमांडर होता. तेव्हा डोकलाममध्ये चीनी सैन्य मागे हटले होते. त्याचाच राग त्याने गलवान खोऱ्यात काढल्याचे सांगितले जाते.

Related Stories

टॉवरवर आलिशान डिनरची तयारी

Patil_p

अनिल देशमुखांचा CBI कोठडीतला मुक्काम वाढला

datta jadhav

Kolhapur; राजर्षी शाहूंची जयंती लोकोत्सव म्हणून साजरा करणार

Abhijeet Khandekar

जगातील सर्वात मोठ्या टायर इम्पयार्डला आग

datta jadhav

शिवसेनेच्या सहकार्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत; अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिवसेनेची प्रतिक्रिया

Archana Banage

चार लाख ट्रॅक्टर्ससहीत शेतकरी काढणार संसदेवर मोर्चा

Archana Banage