Tarun Bharat

गलवान खोऱ्यातून चिनी सैन्य 2 किमी मागे हटले

ऑनलाईन टीम / लेह : 

पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यातील पेट्रोलिंग पॉईंट 14 मधून चीनने आपले सैन्य दीड ते दोन किमी मागे हटवले आहे. सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे. 

पंधरा जूनला गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. यात चीनचे काही सैनिक मारले गेले. त्यानंतर दोन्ही देशातील तणाव आणखी वाढला आहे. चीनने गलवान खोऱ्यासह हॉटस्प्रिंग आणि पँगाँग टीएसओ भागातही घुसखोरी केली आहे. चीनच्या दबावाच्याखेळीसमोर न झुकता भारताने चीनला लागून असलेल्या 3488 किलोमीटरच्या सीमारेषेवर सैन्य तैनात केले आहे. 

तणावग्रस्त परिस्थितीत चीनकडून कोणत्याही प्रकारचा हल्ला झाल्यास त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी लेह आणि श्रीनगर एअरबेसवर लढाऊ विमाने तैनात करण्यात आली आहेत. एअरफोर्सने सुखोई-30 एमकेआय, मिराज 2000 आणि जॅग्वार मोक्याच्या ठिकाणी तैनात केले आहेत. तसेच शक्तिशाली रणगाडेही तैनात आहेत. 

Related Stories

मोदी मंत्रिमंडळातील फेरबदलावर राहुल गांधी म्हणाले…

Tousif Mujawar

मोठ्या प्रमाणात होणार लस उत्पादन

Patil_p

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटणार;भाजपची आज बैठक

Rahul Gadkar

सलमान रश्दी यांच्या प्रकृतीत सुधारणा

Patil_p

कर्नाटकला कोविशिल्ड लसीचे मिळाले ७.५ लाख डोस

Archana Banage

‘कवच’ रोखणार भरधाव रेल्वेंची टक्कर

Patil_p