Tarun Bharat

गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

मानसिक ताणातून मनस्थिती बिघडल्याने संपविले जीवन

प्रतिनिधी / बेळगाव

मानसिक ताणातून मनस्थिती बिडल्यामुळे मजगाव येथीव एका इसमाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मजगावनजीकच्या येळ्ळूर शिवारात आज सकाळी उघडकीस आली.

नेमिनाथ सातगौडा पुजारी (वय 45. रा पुजारी गल्ली मजगाव) असे आत्महत्या करणाऱया इसमाचे नाव आहे. नेमिनाथ याची पत्नी त्याला सोडून गेली असून त्याच्या पश्चात आई आणि भाऊ असा परिवार आहे.

आज सकाळी येळ्ळूर शिवारात मजगावनजीकच्या रेल्वे फाटकाजवळील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला.

त्याच्या पॅन्टच्या खिशात एक मोबाईल आणि कागदाच्या काही चिठ्ठय़ा आढळून आल्या. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हील इस्पितळात पाठविला. याप्रकरणी वडगाव ग्रामीण पोलिस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.

Related Stories

कारवार मार्गावर बोलेरो अपघातात चालक जखमी

Patil_p

बुधवारी पावसामुळे बाजारपेठेवर परिणाम

Patil_p

आकाश रावळ रॉ फिटनेस किताबाचा मानकरी

Amit Kulkarni

आमशी येथे दुचाकी घसरल्याने दुर्गुळवाडीच्या युवकाचा मृत्यू

Archana Banage

अमृतधन मुदतठेव-धनसागर रिकरिंग ठेव योजनांना लोकाग्रहास्तव अंतिम मुदतवाढ

Amit Kulkarni

विनायकनगरमधील रस्त्यांसाठी एक कोटीचा निधी

Patil_p