लोकांचे सांत्वन करण्याचे युवतीचे प्रोफेशन
अनोळखींची गळाभेट घेणे, दुःखी-त्रस्त लोकांचे सांत्वन करणे, हे देखील कुठले प्रोफेशन असू शकते का? पहिल्या नजरेत कुणाचेही उत्तर नाही असेच असणार. परंतु ब्रिटनची क्रिस्टिना लिंकने याला स्वतःचे प्रोफेशनच केले आहे. या जॉबमधून वर्षभरात ती लाखो रुपये कमावत आहे. क्रिस्टिना स्वतःला कड्डल थेरपिस्ट म्हणवून घेते.
पूर्व लंडनच्या स्ट्रटफोर्डमध्ये राहणारी 30 वर्षीय क्रिस्टिना लिंक अशा अनोळखी व्यक्तींची गळाभेट घेते, जे दुःखी, नैराश्यग्रस्त किंवा एकाकीपणाचा शिकार ठरले आहेत. क्रिस्टिना स्वतःच्या एका सेशनमधूनच 17 हजार रुपयांची कमाई करते. ती ग्राहकांना केवळ भावनात्मक पाठिंबा देते, परंतु लोक अनेकदा तिच्या कामाबद्दल चुकीची धारणा करून घेतात.


तिच्या सेवेत संबंधिताचा हात पकडणे, केस कुरवाळणे आणि गळाभेट घेणे सामील आहे. क्रिस्टिना स्वतःच्या एका ग्राहकासोबत 1-3 तासांचा वेळ घालविते. यादरम्यान ती संबंधिताला मानसिक दिलासा आणि हिंमत देण्याचा प्रयत्न करते. या बदल्यात लोक तिला पैसे देतात. या कामाचे अनेक भावनात्मक लाभ आहेत असे ती सांगते. तिचा बॉयप्रेंड देखील तिच्या प्रोफेशनल गरजा ओळखून आहे.
क्रिस्टिनाने 2019 च्या प्रारंभी या अजब प्रोफेशनची सुरुवात केली होती. त्यावेळी क्रिस्टिनाच्या जीवनात प्रेम आणि आत्मियतेच्या कमतरतेसह एकाकीपणा आला होता.
गळाभेट घतल्याने लव्ह हार्मोन ऑक्सिटॉन रिलिज होतात, यामुळे एकाकीपणा आणि तणाव दूर होतो. अशा स्थितीत माझे हे प्रोशन लोकांना दिलासा मिळवून देण्यास मदत करते. कमीत कमी 20 सेकंद गळाभेट घेण्याची गरज असल्याचे अध्ययनातून समजले आहे. परंतु लोक काही सेकंदांसाठीच गळाभेट घेतात. यामुळे ते याच्या पूर्ण प्रभावाचा अनुभव करू शकत नसल्याचे ती सांगते.
कामादरम्यान अशा अनेक लोकांना पाहिले, जे कोरोना महामारीमुळे एकाकी पडले होते. लोक दुःखी असून त्यांना शारीरिक आरामाची आवश्यकता असल्याचे तिने म्हटले आहे.