Tarun Bharat

गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

गारगोटी प्रतिनिधी

गव्याच्या हल्यात शेळोली ता. भुदरगड येथील शिवाजी शंकर सावंत हा शेतकरी गंभीर जखमी झाला. जखमीला कडगाव प्राथमिक उपचार केल्यावर कोल्हापूर येथे सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ही घटना आज दुपारी घडली.

घटना स्थळावरून समजलेली माहिती अशी की शिवाजी सावंत हे शेळी पालन करतात. वेंगरूळचा माळ गायरान शेतांत आपली शेळ्या चरण्यास ते घेऊन गेले असता झूडपात लपलेल्या गव्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. ही बातमी समजताच त्यांना सुनील देसाई यांनी प्रथम कडगाव येथील प्राथमिक रुग्णालयात आणले. प्राथमिक उपचारानंतर गारगोटी ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथे त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक मिलिंद कदम यांनी उपचार केले.

त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरला पाठवण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राहूल देसाई, प्रकाश वास्कर, वन अधिकारी यानी सरकारी दवाखान्यात भेट देवून सहकार्य केले.

Related Stories

कोल्हापूरचा अनिकेत ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबशी करारबद्ध

Abhijeet Khandekar

एक ऑगस्टला एक लाख शाळांमध्ये होणार भारतमाता प्रतिमापूजन

Archana Banage

जप्त केलेली रक्कम नेण्यासाठी मागविला कंटेनर

Archana Banage

मावस भावाकडूनच भररस्त्यात तरुणीचा विनयभंग

Archana Banage

भारताकडून चीनच्या आणखी 47 अ‍ॅप्सवर बंदी

datta jadhav

प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान, कर्जमाफी मिळावी

Archana Banage