Tarun Bharat

गांजाचे कलेक्शन सांगोल्यापर्यत, दीड किलो गांजा जप्त,आणखी चार अटकेत

प्रतिनिधी / कोल्हापूर

शेंडा पार्क येथे छापा टाकून जप्त केलेल्या २० किलो गांजा प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला पर्यंत पोहोचल्याचे निदर्शनास आले. येथून २४ जून रोजी बाळकृष्ण तानाजी नागणे ( वय – २८, रा. रामकृष्ण नगर, मंगळवेढा, जिल्हा सोलापूर ), राहुल शिवाजी देवमारे (वय २७, घर नंबर २७ संत पेठ,पंढरपूर, सोलापूर) संतोष पुंडलिक काळे (वय- ४४,घर नंबर ५८, शिवरत्न नगर, पंढरपूर, सोलापूर), शेषेराव सिताराम जाधव (वय ४२, रा. आष्टा,तालुका भूम, जिल्हा उस्मानाबाद) या ४ जणांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे दीड किलो इतका गांजा जप्त करण्यात आला. या चौघांना न्यायालयाने ५ दिवस कोठडी सुनावली.

कोल्हापुरात गांजा विक्रीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली होती. यावर पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्या आदेशाने कारवाई करण्यात आली. १९ जून रोजी कोल्हापुरातील शेंडा पार्क येथून धनंजय बाबासो शिंदे ( वय – ४०,रा. गांधीनगर, विटा, खानापूर, जिल्हा सांगली),वैभव विजय पाटील (वय ३२ रा. तुळजाभवानी नगर, उजळाईवाडी, कोल्हापूर) या दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडील चौकशीत सांगली जिल्हयातील वीटा येथून हा गांजा कोल्हापुरात विक्रीसाठी आणलेला होता. तो २० किलो गांजा राजारामपुरी पोलिसांनी जप्त केला होता. या गांजाचे कनेक्‍शन शोधण्याचे आदेश शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी दिले. त्यानुसार राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक केलेल्या चौकशीत यांच्याकडून माहिती उपलब्ध करून थेट सांगोला पंढरपूर पर्यंत गांजाचे धागे शोधून काढले सांगोला येथून 24 जून रोजी पोलिसांनी ४ संशयितांना ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस उप अधिक्षक प्रेरणा कट्टे, पोलिस निरिक्षक नवनाथ घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरिक्षक अभिजीत गुरव, पो ना आनंदा निगडे, प्रकाश पारधी, रवी कुमार आंबेकर , सुभाष चौगुले, सिद्धार्थ केदार, पी सी विशाल खराडे, रोहित पोवार, महेश पाटील, प्रशांत पाथरे, तानाजी दावणे यांनी केली.

रॅकेटचा पर्दाफाश करणार – पोलीस उप अधिक्षक कट्टे

एकमेकांना साखळी पद्धतीने गांजाचे वितरण होते. या रॅकेटचे जाळे राज्यभर पसरल्याची शक्यता आहे. त्यामुळे गांजा प्रकरणाचा मुळापर्यंत जावून या रॅकेटचा पर्दाफाश करणार आहे. गांजा कोठून कुठे येतो व कुठपर्यंत जातो याची माहिती उपलब्ध झाल्याचे शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी सांगितले

उपनिरिक्षक गुरव ग्रेटच- प्रेरणा कट्टे

पोलीस उपनिरिक्षक अभिजीत गुरव यांनी गुन्हे शोध पथकामध्ये अतिशय चांगले काम केले आहे.आजवर त्यांनी ११ चोरीच्या दुचाकी पकडल्या, अवैद्य दारुवर कारवाई, गांजावर कारवाई केली आहे.

इंजिनिअरंगी ते गांजा विक्रेता

वैभव विजय पाटील ( ३२,रा. उजळाईवाडी ) स्वतः इंजिनिअर आहे. त्याला गांजाचे व्यसन जडले. त्याचे वडील डॉक्टर आहेत. पण तरीही तो या दृष्ट चक्रात अडकला आणि गांजा विक्रेता बनला. त्यामुळे उमलण्यापुर्वी त्याचे जीवण उद्धस्त झाले.

Related Stories

बोलेरो पिकअप अंगावरुन गेल्यामुळे तीन वर्षाची बालिका जागीच ठार

Archana Banage

कोल्हापूर : वैद्यकीय क्षेत्रातील आरोग्य सेवा मोहीम कौतुकास्पद

Archana Banage

महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट : मंगळवारी 60,212 नवे रुग्ण

Tousif Mujawar

फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न

Archana Banage

कृष्णा रूग्णालयातून तिघांना डिस्चार्ज

Patil_p

समित ठक्करला 9 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Tousif Mujawar