Tarun Bharat

गांजाविक्रेत्यांविरुध्द बेळगाव पोलिसांची धडक मोहीम

प्रतिनिधी / बेळगाव

बेळगाव पोलिसांनी गांजा विपेत्यांविरूध्द कारवाईचा सपाटा सुरु केला आहे. शुक्रवारी दिवसभरात सीसीआयबी, एपीएमसी, माळमारुती पोलिसांनी केलेल्या कारवाईत 27 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. तर दोघा आंतरराज्य गुन्हेगारांसह 13 जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी ही माहिती दिली आहे. अटक करण्यात आलेल्या 13 जणांकडून 12 मोबाईल संच, एक कार, तीन दुचाकी, 15 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या संबंधी तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बेळगावला गांजा पुरवठा करणाऱयांचे पाळेमुळे खणण्यात येत आहेत.

सीसीआयबीचे पोलीस निरीक्षक संजीव कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी होलसेल प्रुट मार्केटजवळ तीघा जणांना अटक करुन अडीच लाख रुपये किंमतीचा 15 किलो 500 ग्रॅम गांजा, एक कार, तीन मोबाईल संच, 4 हजार 600 रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. गुन्हे तपास विभागाचे एसीपी एन. व्ही. बरमनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

मल्लाप्पा सिध्दराम निपाणी (वय 45, मुळचा रा. नागरमुन्नोळी, सध्या रा. मुगळखोड, ता. रायबाग), मोनाप्पा मल्लाप्पा वाड (वय 35), विश्वराज हणमंत बैनार (वय 26, दोघेही रा. आलूर, जिल्हा गुलबर्गा) अशी अटक करण्यात आलेल्या त्रिकुटांची नावे आहेत. या त्रिकुटाविरुध्द येथील सीईएन पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

सहा जणांना अटक

माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहा जणांना अटक करुन 5 किलो 690 ग्रॅम गांजा व 11 हजार रुपये रोख रक्कम, 4 मोबाईल संच जप्त केले आहेत. ऑटोनगर येथील एका घरातून गांजाचा साठा जप्त करण्यात आला आहे. मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. जी. एन. भोसले, के. बी. गौराणी, एस. जे. लक्कर, शंकर गुडदैगोळ, मंजुनाथ मेलसर्ज, शिवाजी चव्हाण, रमेश हिरेमणी, सुनील फडी आदींचा समावेश असलेल्या पथकाने या कारवाईत भाग घेतला.

अत्तारअली सिध्दीकली (वय 21, रा. लातुला, आसाम, सध्या रा. ऑटोनगर), अमीर मौलाली शेख (वय 20, रा. मरगूर, ता. इंडी, जि. विजापूर, सध्या रा. ऑटोनगर), सादीक अक्तारहुसेन तडकोड (वय 33, रा. न्युगांधीनगर), ओंकार परशराम पवार (वय 30, रा. मारुतीनगर), सुरज सुरेश हिंडलगेकर (वय 19, रा. दुर्गामाता रोड, जुने गांधीनगर), अलीअब्बास इस्माईल बुखारी (वय 33, रा. आश्रय कॉलनी, रुक्मिणीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या सहा जणांची नावे आहेत.

मिरज येथील दोन तरुण जाळय़ात

एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिरज येथील दोघा आंतरराज्य गुन्हेगारांसह चार जणांच्या टोळीला अटक करुन 6 किलो 28 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्या जवळून 3 मोटार सायकली (केए 22 ईक्मयु 4491, एमएच 10 सीएच 3366, नंबर प्लेट नसलेली सुजुकी एक्सेस), 5 मोबाईल संच जप्त करण्यात आले आहेत.

सर्फराज महम्मदहनीफ जमखंडीकर (वय 27), निहाल इम्तियाज मोमीन (वय 21, दोघेही रा. मिरज, जि. सांगली), नागनगौडा शिवलिंगाप्पा पाटील (वय 45, रा. गद्दीकरविनकोप्प, ता. बैलहोंगल), मल्लिकार्जुन सिध्दबसाप्पा आलूर (वय 40, रा. रामतीर्थनगर) अशी अटक करण्यात आलेल्या चौघा जणांची नावे असून त्यांच्यावर अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

दुचाकीवरुन आणतात गांजा

एपीएमसी पोलिस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी अटक केलेल्या मिरज येथील दोन तरुणांची कसून चौकशी केली असता दुचाकीवरुन बेळगावला त्यांनी गांजा पोहोचवत असल्याचे उघडकीस आले आहे. कारमधून आणले तर कुठेतर नाक्मयावर कार अडवून तपासणी होवू शकते, त्या भितीने हे दोघे दुचाकीवरुन गांजा पोहोचवत होते. मल्लिकार्जुन हा निवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा मुलगा असून गांजा विक्री प्रकरणात त्यालाही अटक झाली आहे. तर नागनगौडा याने एका गुन्हेगारी प्रकरणात कारावास भोगला होता. त्याचाही या प्रकरणात सहभाग आढळून आला आहे. दोघा आंतरराज्य गुन्हेगारांसह चौकडीला अटक करण्यात आली असून गांजा पुरवठा कोठून होतो याची पाळेमुळे खणण्यात येत असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी सांगितले.

Related Stories

प्रथमच सार्वजनिक गणेशमूर्तींचे रात्री दहापूर्वी विसर्जन

Patil_p

खानापूरमधील ‘त्या’ शाळकरी मुलांच्या मृत्यूने हळहळ

Amit Kulkarni

दहावी विद्यार्थ्यांसाठी 4 पासून व्याख्यानमाला

Amit Kulkarni

भू-माफिया एजंटांची पिरनवाडीमध्ये दहशत

Amit Kulkarni

वाढीव वीजबिलाने ग्राहक हैराण

Amit Kulkarni

अथणी तालुक्यात 14 पॉझिटिव्ह

Patil_p