Tarun Bharat

गांजा पिकवायला शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे परवानगी मागावी; सदाभाऊ खोतांची खोचक मागणी

सांगली / प्रतिनिधी

राज्यातील देशी दारू, बिअरबार चालकांच्या नुकसानीची शरद पवार यांना काळजी लागली आहे. त्यांच्यासाठी ते मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित आहेत, मात्र या जाणत्या राजाने शेतकऱ्यांच्या अश्रूकडे, कष्टकऱ्यांच्या वेदनांकडे लक्ष देण्याची गरज होती. शेती उद्‍ध्वस्त झाली आहे, शेतमाल कुजून जातो आहे. अशावेळी शेतकऱ्यांना या संकाटातून बाहेर काढण्यासाठी या खरीप हंगामात त्यांना गांजा पिकवायला परवानगी द्यावी. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना तसे पत्र लिहून परवानगी मागावी, अशी खोचक मागणी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, आमदार सदाभाऊ खोत यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

सदाभाऊ खोत म्हणाले,‘‘शरद पवार यांचे पत्र वाचून मला एकच प्याला नाटकाची आठवण झाली. त्यातील नायक सुधाकर याला त्या एकाच प्यालात गरिबांच्या झोपड्या, अनेकांचे श्रम, दीनदलितांच्या व्यथा सामावल्यासारख्या वाटत होत्या. पवारसाहेबांचे तसेच झाले असावे. राज्यात शेतकरी उद्‍ध्वस्त झाला आहे. फळे, भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाले आहे. बाजारपेठ बंद आहे. कांदा अडचणीत आहे. गारपीट, अवकाळीच्या भरपाईची चर्चाही नाही.

नाशवंत शेतमालाचे नियोजन सरकारने करायला हवे होते. तसे झाले नाही. जिल्हानिहाय धोरण वेगळे आहे. राज्यात कुठेही एकवाक्यता नाही. अशा स्थितीत खरीप हंगाम तोंडावर आला आहे. खते आणि बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना कर्ज लागेल. मागची थकबाकी असताना ते कसे मिळणार ? त्याबाबत धोरण नाही. त्यामुळे जाणत्या राजाने शेतकऱ्यांना दारू काय अन् गांजा काय ? दोन्ही नशाच. त्यामुळे चिंता नसावी. खरे तर शेतकऱ्यांनीच दारू तयार केली असती, मात्र पवार यांच्या चेल्यांनी एवढ्या भट्ट्या उभ्या केल्या आहेत की आम्हाला हातभट्टी उभा करायलाही जागा नाही.’’असा टोलाही आ.सदाभाऊ खोत यांनी यावेळी बोलताना मारला.

Related Stories

मुंबई-गोवा महामार्गाचं काम २०२३ पर्यंत पूर्ण करणार – मंत्री रवींद्र चव्हाण

Archana Banage

शाहुवाडी तालुका शिवसेनेच्या वतीने चिनी वस्तूंचा निषेध

Archana Banage

इंशा अल्लाह…एक दिवस हिजाबी पंतप्रधान होईल

datta jadhav

पीक कर्ज नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याज

Archana Banage

तिबेटमध्ये भूकंपाचे धक्के

Tousif Mujawar

Solapur; श्री सिद्धेश्वर महाराजांच्या ऐतिहासिक चरित्रग्रंथाची चोरी

Abhijeet Khandekar