Tarun Bharat

गांजा, मोबाईल कळंबा कारागृहातील टोळीसाठी

प्रतिनिधी / कोल्हापूर

कळंबा कारागृहात फेकण्यात आलेल्या 10 मोबाईल, गांजा प्रकरणाची दखल कारागृह प्रशासनाच्या वरिष्ठ पातळीवरुन घेण्यात आली आहे. कारागृहात टाकण्यात आलेले 10 मोबाईल नवीन असून ते कोल्हापूर जिह्यातील एका टोळीसाठी असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणची चौकशी करण्यासाठी आज कारागृहाचे अपर पोलीस महासंचालक सुनिल रामानंद कोल्हापूरात येण्याची शक्यता आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कळंबा मध्यवर्ती कारागृहात मंगळवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास मोटारीतून आलेल्या दोघा अज्ञातांनी गांजा व 10 मोबाईल, चार्जर, कॉड चार, दोन पेन ड्राईव्ह, फेकण्यात आले होते. कापडÎाच्या तीन पुडक्यांमध्ये बांधून हे कारागृहाच्या भिंतीवरुन फेकण्यात आले होते. कळंबा कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेचा हा प्रकार लक्षात आला. त्यांनी याची माहिती वरिष्ठांना देऊन याबाबतची फिर्याद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली.

 कारागृहात सापडलेले 10 मोबाईल हे नवीन असून त्यामध्ये सीम कार्ड नाही आहेत. या मोबाईलबाबात माहिती मिळविण्यासाठी पोलिसांनी संबधित मोबाईल कंपनीशी पत्रव्यवहार केला आहे. हे मोबाईल कोणत्या डिलर, विक्रेत्यामार्फत विक्री झाले, ते कोणी खरेदी केले होते याबाबतची माहिती त्यांनी मागवली आहे. अद्याप पेन ड्राईव्हची तपासणी करण्यात आलेली नाही. संबधित दोघा संशयितांचा व त्याच्या मोटारीचा शोध सुरू आहे. दरम्यान ती मोटार गंगावेश पर्यंत आल्याची माहिती तपासात समोर आली आहे. उद्या कारागृहाचीही झडती घेण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

अधिकारी, कर्मचारी चौकशीच्या भोवऱयात

या प्रकरणाची दखल कारागृह प्रशासनाने गांभीर्याने घेतली असून याची चौकशी सुरू केली आहे. कारागृहातील संपूर्ण बरॅकची सखोल तपासणी करण्यात आली. काही बंदीचीही चौकशी करण्यात आली असून बंदोबस्ताला असणाऱया कर्मचायांकडूनही माहिती घेतली जात आहे. दरम्यान, अपर पोलिस महासंचालक (कारागृह) सुनील रामानंद यांची कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी भेट घेऊन घडलेल्या प्रकराची माहिती दिली. या प्रकरणाचा अहवालही त्यांना लवकरच देण्यात येणार आहे. 

कोल्हापूरातील दोन टोळ्या रडारावर

कोरोना संकट काळात पॅरोलवर बाहेर गेलेले बंदी आता पुन्हा कारागृहात परतू लागले आहेत. कारागृहात शहरातील ग्रामपंचायतीपाठोपाठ महापालिका निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी कारागृहात असणाऱया शहरातील व इचलकरंजीतील टोळीचा आधार घेण्यासाठी हे मोबाईल फेकण्यात आले असावेत असा प्रशासनाचा संशय आहे. त्या अनुषंगानेही त्यांचा तपास सुरू असल्याचे समजते. मात्र याबाबत प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

अपर पोलीस महासंचालक (कारागृह) आज कोल्हापूरात शक्य कळंबा कारागृहात 10 मोबाईल फेकण्याच्या प्रकरणाची गंभीर दखल कारागृह प्रसासनाने घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आज (शुक्रवारी)  अपर पोलीस महासंचालक (कारागृह) सुनिल रामानंद भेट देण्याची शक्यता आहे. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

Related Stories

कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींवर जि.प.चा वॉच

Archana Banage

मोटरसायकल अपघातात उंदरवाडीचा तरुण ठार, एक जखमी

Archana Banage

लाखो भाविकांच्या उपस्थितीत बाळुमामांचा भंडारा उत्सव संंपन्न

Archana Banage

अमोल माळी गँगचा फरारी मिंटू राय गजाआड

Archana Banage

कोल्हापूर : मुक्तसैनिक वसाहतीमध्ये घरफोडी

Archana Banage

अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यास धनगर समाज बांधव उपस्थित राहणार

Abhijeet Khandekar