Tarun Bharat

गांधीधाम-पुरी एक्सप्रेसच्या दोन डब्यांना आग

ऑनलाईन टीम / नंदुरबार :

नंदुरबार स्थानकाजवळ गांधीधाम-पुरी एक्सप्रेसच्या दोन डब्यांना आग लागली आहे. स्टेशन जवळ आल्याने एक्सप्रेसचा स्पीड कमी होता. त्यामुळे आग लागलेल्या डब्यातील सर्व प्रवाशी वेळीच बाहेर पडले. मोटरमनने एक्सप्रेस थांबवली असून, अग्निशमन दलाच्या जवानांनीही घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यास सुरुवात केली आहे. घटनास्थळी नंदुरबार अग्निशमन दलाच्या चार गाडय़ा दाखल झाल्या आहेत.

आज सकाळी गांधीधाम एक्सप्रेस गांधीनगरवरुन पुरीकडे जात होती. दरम्यान, नंदुरबार रेल्वे स्थानकाजवळ या एक्सप्रेसच्या पॅन्ट्री कार आणि एका एसी बोगीला आग लागली. स्थानकाजवळ स्पीड कमी असल्याने आग लागलेल्या बोगींमधील प्रवाशी सुखरुप बाहेर पडले. दरम्यान, नंदुरबार स्थानकावर रेल्वे प्रशासनाकडे आग विझवण्यासाठी पुरेशी यंत्रणा सज्ज नसल्याने आगीने रौद्र रुप धारण केले. सध्या नंदुरबार स्थानिक प्रशासनाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतू, प्रवाशांच्या सामानाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Related Stories

एच. के. पाटील काय म्हणतात त्यालाच आम्ही महत्व देतो; प्रफुल्ल पटेलांचा पटोलेंना टोला

Archana Banage

वडिलांना बनवा स्टायलिश; तुमच्या वाॅर्डरुममध्ये ठेवा ‘हे’ कपडे

Abhijeet Khandekar

घाईघाईने निर्बंध शिथिल करून धोका पत्करू नका : उद्धव ठाकरे

Tousif Mujawar

जगभरातील कोरोनाबळींची संख्या 8.5 लाखांवर

datta jadhav

अंबादास दानवे शिंदे गटात जाणार? संजय शिरसाट यांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण

datta jadhav

‘CTET’ परीक्षा डिसेंबर-जानेवारीमध्ये

datta jadhav