Tarun Bharat

गांधीनगरजवळ सव्वादोन किलो गांजा जप्त

सीआयडी विभागाची कारवाई, दोघा जणांना अटक

प्रतिनिधी/ बेळगाव

गांधीनगरजवळील सर्व्हिस रोडवर गांजा विकणाऱया दोघा जणांना सीआयडी, एनडीसी विभागाने अटक केली आहे. त्यांच्या जवळून 2 किलो 200 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

शमसुद्दीन दौलतशहा मकानदार (वय 37, रा. रुक्मिणीनगर), महम्मदहनीफ गौस तहसीलदार (वय 57, मूळचा रा. उचगाव, सध्या रा. न्यू गांधीनगर) अशी त्यांची नावे आहेत. सीआयडीचे डिटेक्टीव्ह उपनिरीक्षक लक्ष्मण हुंडरद, जगदीश भागणावर, जी. आर. शिरसंगी, चिदंबर चट्टरकी, जे. एम. नगारी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.

जप्त मुद्देमालाची किंमत 40 हजार 800 रुपयांइतकी होते. पोलिसांनी दोन मोबाईल संच व 650 रुपये रोख रक्कमही जप्त केली असून शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत या दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

काँग्रेसच्या आयुब खानवर कारवाई करा

Amit Kulkarni

टिळकवाडी विभाग, सेंट पॉल्स यांना विजेतेपद

Amit Kulkarni

बॅरिकेडसचा विळखा, वाहनधारकांच्या जीवाला धोका

Amit Kulkarni

ख्रिस्त दिनानिमित्त कोरोना बाधितांना फळांचे वाटप

Patil_p

कोरोनामुक्त राहण्यासाठी खबरदारी आवश्यक

Omkar B

महिलांनी सर्वच क्षेत्रात आघाडीवर रहावे

Amit Kulkarni