Tarun Bharat

गांधीनगर ग्रामपंचायतीसमोर होणार जवाब दो आंदोलन

वार्ताहर / उचगांव

सिंधी सेंट्रल पंचायतीच्या थकीत करवसुलीच्या मागणीसाठी दलित महासंघाच्यावतीने शुक्रवारी (दि. २१) करवीर तालुक्यातील गांधीनगर ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर जवाब दो आंदोलन करण्यात येणार आहे. तसा इशारा दलित महासंघाच्यावतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

बर्‍याच वर्षांपासून कर थकित असूनही ग्रामपंचायतीने सिंधी सेंट्रल पंचायतीकडून करवसुली केली नाही. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रारी करूनही ग्रामपंचायतीने डोळेझाक केली. सर्वसामान्य जणांचा 1-2 वर्षांचा कर थकित राहिला, तर ग्रामपंचायत तगादा लावून कर्मचाऱ्यांकडून ही वसुली करवून घेतली जाते. मग बऱ्याच वर्षांचा सिंधी सेंट्रल पंचायतीचा कर थकित असूनही तो वसूल होत नाही. याप्रश्नी दलित महासंघ शुक्रवारी आंदोलन छेडणार आहे. याबाबतचे निवेदन ग्राम विकास अधिकारी चंदन चव्हाण यांनी स्वीकारले. निवेदन देताना दलित महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब कांबळे, शहराध्यक्ष राजू कांबळे, कार्याध्यक्ष नबीसाहेब नदाफ, अनिल हेगडे, अर्जुन कांबळे उपस्थित होते.

Related Stories

कागल : वीजबिले दुरुस्त करून द्या

Archana Banage

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या योजना शेतकर्‍यांना नवसंजीवनी देणाऱ्या

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात सक्रीय रूग्णसंख्या शंभरीपार

Archana Banage

कोल्हापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी पंचायत समिती सदस्यांना मतदानाचा हक्क मिळावा

Archana Banage

वर्षा पर्यटनाला गगनबावडा घालतोय साद !

Archana Banage

पंचायत समिती सदस्यांना मिळणार निधी

Archana Banage