Tarun Bharat

गांधीनगर मुख्य रस्त्यावर केळी विक्रेत्या महिलेचा खून

उचगाव / वार्ताहर

गांधीनगर मुख्य रस्त्यावर उचगाव हद्दीतील एलजी शोरूम समोर मनाडे मळा कॉर्नर येथे दोन दिवसापूर्वीच इमारतीमध्ये राहण्यासाठी आलेल्या केळी विक्रेत्या महिलेचा अज्ञाताने खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. सुरीने वार करुन दगडावर डोके आपटून खून झाल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांनी अंदाज वर्तविला आहे. मंजुळा बसू बेळेकरी (मूळ रा.कर्नाटक ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. गांधीनगर पोलिसांची पथके शोधासाठी विविध ठिकाणी रवाना झाले आहेत. त्यातील एक पथक निपाणी,संकेश्वरकडे रवाना झाल्याचे समजते.

दोन दिवसांपूर्वी एका वॉचमनच्या ओळखीने या इमारतीमध्ये ती महिला पतीसमवेत राहण्यासाठी आली. तिच्याकडे एक पुरुषही येत होता. गेल्या आठवड्यातच या महिलेचा गोकुळ शिरगाव परिसरात वाद झाला होता. त्यानंतर ती याठिकाणी राहण्यासाठी आली. तिचे नाव मंजुळा असून ती मूळ कर्नाटकातील असल्याची चर्चा घटनास्थळी होती.अनैतिक संबंधांमधून हा खून झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी आर आर पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. तपासासाठी पोलिस पथके नेमण्याच्या सूचना गांधीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांना देण्यात आल्या. पोलिसांनी तपास गतिमान केला आहे.

Related Stories

खासबाग कुस्ती मैदानासाठी निधी देणार

Abhijeet Khandekar

सरकारी वसतीगृहात शिपायाची आत्महत्या

Tousif Mujawar

कोल्हापुरात प्रथमच कोरोना मृत्यूसंख्या एकेरीत

Archana Banage

मास्क विक्रीत कोल्हापूर टॉप-2

Archana Banage

भारत जोडो यात्रेच्या योग्य बंदोबस्ताबद्दल आ. सतेज पाटील यांनी मानले पोलीस दलाचे आभार

Abhijeet Khandekar

देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये मंगळवारी विभागीय रोजगार मेळावा

Abhijeet Khandekar