Tarun Bharat

गांधी मार्केटातील व्यापाऱयांची पालिकेला धडक

काही विक्रेते नियम न पाळता दुकाने खुली ठेवत असल्याचा मुद्या, नगराध्यक्षांना विचारला जाब

प्रतिनिधी / मडगाव

मडगावच्या न्यू मार्केटमधील तीन-चार भाजीपाला विपेते व गांधी मार्केटला भिडून असलेला एक खासगी विपेता यांनी पांढऱया व पिवळय़ा रेषेचे नियम न पाळता मंगळवारप्रमाणे सलग बुधवारीही दुकाने खुली ठेवल्याने गांधी मार्केटमधील काही व्यापाऱयांनी पालिकेला धडक दिली व नगराध्यक्षांना यासंदर्भात जाब विचारला.

पालिकेच्या नगराध्यक्षा पूजा नाईक यांनी मंगळवारी दोन्ही बाजारपेठांना भेट देऊन नियम मोडले, तर खपवून घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र न्यू मार्केटमधील मधील भाजीपाल्याची काही दुकाने बुधवारीही चालू असल्याने गांधी मार्केटमधील विपेत्यांनी त्यास आक्षेप घेतला. विक्रेते संघटनेचे नेते राजेंद्र आजगावकर यांनी मार्केट निरीक्षकांना विचारले असता नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांनी ती खुली ठेवण्यास मुभा दिली आहे, कारण भाजीपाला खराब होऊ शकतो, असे सांगण्यात आले.

नाईक – आजगावकर शाब्दिक चकमक

गांधी मार्केटमध्ये कित्येक दुकाने भाजीपाल्याची विक्री करतात. ती आळीपाळीने बंद ठेवली जातात. या विपेत्यांकडील मालही खराब होत असतो. या सर्वांना दुकाने सलग खुली ठेवण्यास आम्ही सांगू का, अशी विचारणा आजगावकर यांनी नगराध्यक्षांना जाब विचारताना केली. यावेळी आजगावकर व नगराध्यक्षा नाईक यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. उगाच न्यू मार्केटमधील सदर दुकाने खुली ठेवण्यास आपण सांगितल्याचा आरोप करू नका, असे नाईक यांनी स्पष्ट केले. तर मार्केट निरीक्षक तसे सांगत आहेत, याकडे आजगावकर यांनी लक्ष वेधले.

नियम न पाळणारी दुकाने बंद करण्याचे निर्देश

गांधी मार्केट परिसरातील एक खासगी दुकानदार जो मार्केटचा भाग नाही त्याने दुकान खुले ठेवू देण्याची विनंती केली असता सर्व खासगी दुकाने खुली असल्याने आपण त्याला दुकान खुले ठेवण्यास सांगितले होते. त्याचे दुकान बाजारपेठेला भिडून आहे वा तेथे सोशल डिस्टन्सिंग राखणे शक्मय होत नाही याची आपल्याला कल्पना नव्हती, असे नाईक यांनी स्पष्ट केले. ज्या दिवशी ज्या रेषेमधील दुकाने खुली करण्यास मुभा आहे त्यांनाच खुले राहू द्यावे व अन्य दुकाने बंद करावीत असे निर्देश नगराध्यक्षांनी यावेळी मार्केट निरीक्षकांना दिले. त्यानंतर नियम मोडून खुली असलेली दुकाने बंद करण्यात आली. आजगावकर यांच्यासह अश्रफ पंडियाल, अशोक नाईक, मोयनू तहसिलदार, रोहन शंखे व अन्य उपस्थित होते.

Related Stories

खेलो इंडियाच्या‘सेंटर ऑफ एक्सलन्स’साठी पेडे स्टेडियम चांगला पर्याय

Amit Kulkarni

धान्यासाठी बेतोडय़ात मजूरांची झुंबड सामाजिक अंतराचा भंग

Omkar B

कुडचडेतील चंदेरी महोत्सव हे गोव्याचे भूषण : काब्राल

Amit Kulkarni

प्रो. फुटबॉल स्पर्धेत सेसा अकादमीचा यूथ मानोरावर 5-3 असा विजय

Amit Kulkarni

बायंगिणी प्रकल्पाची अधिसूचना जारी

Amit Kulkarni

वडिलांकडून झालेल्या बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू

Patil_p