Tarun Bharat

गाजर खा, निरोगी रहा!

साधारणतः थंडीच्या मोसमात बाजारात भरपूर प्रमाणात उपलब्ध होणारे कंदमूळ म्हणजे गाजर! गाजर म्हटलं तरी प्रत्येकाला आठवण होते ती गोड, रसरशीत आणि तोंडाचा ताबा मिळविलेल्या गाजराच्या हलव्याची! आहारवेदामध्ये पौष्टीक घटक आणि गुणकारी गुणधर्मामुळे गाजराला अधिक महत्व देण्यात आले आहे. त्यामुळे आजच्या आठवडी बाजारात गाजराविषयी जाणून घेऊया.

गाजर हे एक प्रकारचे कंदमूळ म्हणून ओळखले जाते. बाहेरुन केशरी रंगाचे आणि आतून गोड मधूर आणि रसरशीत असे गाजर तसे सर्वांच्याच आवडीचे. यामध्ये अ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असून लोह, फॉस्फरस, कॅल्शियम, प्रथिने, खनिजे, आर्द्रता, तंतुमय व पिष्टमय घटकही असतात. गाजरामध्ये कॅरोटीन हा घटक विपूल प्रमाणात असतो. त्यामुळे सॅलड, कोशिंबीर, हलवा, खीर, सुप, गाजर भात अशा अनेक आहार प्रकारांमध्ये गाजराचा वापर नियमित केला जातो. गाजराच्या नियमित सेवनाने शरीराला योग्य ती ऊर्जा व शक्ती मिळते.

गाजराचा दर  

सध्या बाजारात भरपूर प्रमाणात गाजर उपलब्ध असून अर्धा किलो 30 ते 40 व प्रति किलो गाजर 60 ते 70 रुपये दराने विकले जात आहे. भेंडीबाजार, खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, समादेवी गल्ली आदी बाजारपेठेमध्ये गाजर विक्रीस येत आहेत. खास करुन संक्रांतीनंतर याची आवक बाजारात वाढत असून गाजरांच्या विशेष हंगामात हलवा आपल्या मुलांनी खावा यासाठी महिलावर्गांकडून गाजराची खरेदी अधिक होताना पहावयास मिळते.

आरोग्यदायी फायदेः

0 गाजरामध्ये अ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे लहान मुलांची शारीरिक आणि बौद्धिक वाढ चांगली होण्यासाठी नियमित गाजराचे सेवन करावे.

0 डोळय़ाचे आरोग्य चांगले राखते.

0 शरीरातील पाण्याची कमतरता भरुन काढते.

0 मुळव्याधीचा त्रास असल्यास आराम पडतो.

0 सौंदर्य खुलविण्यासाठी गाजर उपयुक्त आहे. त्वचा कोमल, मुलायम बनते. चेहऱयाचा टवटवीतपणा वाढविण्यासाठी गाजराचा लेप चेहऱयावर हलक्या हाताने लावावा.

0 रक्त शुध्द करणारे गुणधर्म असल्याने रक्तविकार, गाठी, सूज व त्वचेसंदर्भातील दोष नाहीसे होतात.

0 गाजर चावून खाल्याने दात व हिरडय़ा मजबूत होतात.

0 पचनक्रिया सुरळीत होते.

0 भाजलेले गाजर हृदय विकारावर लाभदायक आहे.

0 लहान मुलांना दात येताना गाजराचा रस प्यायला दिल्यास त्रास न जाणवता मजबूत दात येतात.

0 पोटाच्या आणि आतडय़ाच्या तक्रारींवर गाजर उपयुक्त ठरते.

0  कर्करोग, लठ्ठपणा, हृदयरोग, रक्तदाब, हाड आणि स्नायूचे विकार अशा अनेक विकारांवर गाजर उपयुक्त ठरते.

   शिवानी पाटील

Related Stories

टेकिंगमास्टर हष

Patil_p

सण येता गोडव्याचा

Patil_p

ऊर्जा सकारात्मकतेचा

tarunbharat

बदलता भोजनसंस्कार

Patil_p

युवा वर्ग जागृत होतोय

Patil_p

कौटुंबिक अर्थसंकल्प

Patil_p
error: Content is protected !!