Tarun Bharat

सुधीर गाडगीळ यांना अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचा पुरस्कार जाहीर

Advertisements

पुणे / प्रतिनिधी  :  

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक) पुणे केंद्र संस्थेच्या ४७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मुलाखतकार सुधीर गाडगीळ, पार्श्वगायक जितेंद्र अभ्यंकर आणि कलाकार धनश्री काडगांवकर यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दिनांक ५ जानेवारी रोजी सायंकाळी ४. ४५ वाजता नारायण पेठेतील केसरी वाडयाच्या लोकमान्य सभागृहात होणार आहे, अशी माहिती अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक) पुणे केंद्राचे प्रमुख मकरंद माणकीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

मकरंद माणकीकर म्हणाले, यंदाचा विशेष पुरस्कार मुलाखतकार सुधीर गाडगीळ, संगीत सेवा पुरस्कार पार्श्वगायक जितेंद्र अभ्यंकर, रंगकर्मी पुरस्कार तुझात जीव रंगला फेम धनश्री काडगांवकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय १०१ वर्षाचे सोपानराव कालेकर यांना उद्योग आदर्श रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तर, डीआरडीओ चे शास्त्रज्ञ व्यंकटेश परळीकर यांना देखील त्यांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात येईल. 

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांचा मुलखा वेगळी माणसं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गाडगीळ यांनी राजकीय, नाटय, कला, संगीत क्षेत्रातील व्यक्तींच्या घेतलेल्या मुलाखतीतील रंगतदार किस्से यानिमित्ताने ऐकायला मिळणार आहे. तरी पुणेकरांनी मोठया संख्येने कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. 

Related Stories

डोळय़ांवर बळावर नोंदविला विश्वविक्रम

Patil_p

रशियात कोरोनामुळे दिवसात 1000 मृत्यू

Patil_p

माकडांसाठी होते मेजवानीचे आयोजन

Patil_p

मंडई म्हसोबा मंदिर उत्सव : दाक्षिणात्य पद्धतीची आकर्षक पुष्पसजावट

Tousif Mujawar

पालकांपासून वेगळे रहा, 20 हजार मिळवा

Amit Kulkarni

गवंडीकाम करणारी युवती ब्रँड ऍम्बेसिडर

Patil_p
error: Content is protected !!