Tarun Bharat

गायब सदस्य परतले अन् सरपंच, उपसरपंचही बनले!

कादवड  सरपंचपदी सुवर्णा सकपाळ, उपसरपंचपदी महेश जाधव विजयी

चिपळूण

गेल्या 2 दिवसांपासून गायब असलेले कादवड ग्रामपंचायतीचे दोन्ही सदस्य बुधवारी सरपंच, उपसरपंच निवडणूक प्रक्रियेवेळी हजर झाले आणि निवडूनही आले. मात्र गायब नाटय़ामुळे निवडणूक प्रक्रियेवेळी ग्रामपंचायतीला पोलीस छावणीचे स्वरूप आल्याने तणावपूर्ण वातावरणातच सरपंचपदी सुवर्णा सकपाळ व उपसरपंचपदी महेश जाधव निवडून आले. ग्रामपंचायतीवर शिवसेना पुरस्कृत पॅनलचा भगवा फडकला असून विरोधकांनी केलेला आरोप दोन्ही सदस्यांनी फेटाळून लावला आहे.

  दोन सदस्य गायब झाल्याने कादवड ग्रामपंचायतीची सरपंच निवडणूक 2 दिवस गाजत होती. एकूण 7 सदस्यांपैकी शिवसेना पुरस्कृत पॅनलने 2 तर राष्टवादी पुरस्कृत पॅनलने 5 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्तापित केले. मात्र सरपंच निवडणूक घोषित होताच गावात वेगान राजकीय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचे दोन सदस्य शिवसेना पुरस्कृत पॅनलच्या गळाला लागल्यानंतर पुढील नाटय़ घडले. नवनिर्वाचित सदस्या सुवर्णा सकपाळ आणि महेश जाधव हे दोघे सोमवारी सायंकाळ पासून गायब असल्याचे सांगत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱयांनी विरोधकांवर ठपका ठेवला होता. त्यातच नातेवाईकांनी थेट पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने राजकीय वर्तुळ ढवळून निघाले.

आम्ही सुरक्षित ठिकाणी होतो

सोमवारपासून पोलिसांनी त्या दोघांचा तपास सुरू केला. मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागले नव्हते. त्यांना जबरदस्तीने पळवून नेले, असा आरोप सातत्याने राष्ट्रवादी पदाधिकारी करत होते. अखेर बुधवारी सकाळी त्या दोन्ही सदस्यांनी स्वतःच व्हिडीओ क्लिपच्या माध्यमातून खुलासा करत दोन दिवस सुरू असलेल्या नाटय़ावर पडदा टाकला. आम्हांला कोणीही पळवलेले नाही, आम्ही पळालोही नाही, आम्ही सर्व सुरक्षितस्थळी एकत्र असून शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य राकेश शिंदे यांचे सहकार्य घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने याला नाटय़मय कलाटणी मिळाली.

   दोन्ही सदस्यांना मानाचे पान

बुधवारी सकाळी  सेनेच्या 2 सदस्यांसह सुवर्णा सकपाळ व महेश जाधव ग्रामपंचायतीत दाखल झाले. निवडणूक निर्णय अधिकारी एस. जी. जानवलकर यांच्या उपस्थितीत सुवर्णा सकपाळ यांनी थेट सरपंचपदासाठी तर महेश जाधव यांनी उपसरपंचपदासाठी अर्ज दाखल केल्याने राष्ट्रवादीच्या सत्ता स्थापन करण्याच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलकडून सरपंचपदासाठी स्वप्नील शिंदे व उपसरपंचपदासाठी सबा चौगुले यांनी अर्ज दाखल केला. शेवटी निवडणूक होऊन 4-3 मतांनी सकपाळ व जाधव दोघेही निवडून आले आणि शिवसेनेच्या गोटात जल्लोष झाला.  

    पोलिसांचा वेढा

दोन सदस्यांच्या गायब होण्याने निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनाने चाळीस पोलिस अधिकाऱयांसह चोख बंदोबस्त ठेवला होता. ग्रामपंचायतीला चारही बाजूने पोलिसांचा वेढा होता. निवडणुकीनंतर गावातील तणावपूर्ण वातावरण लक्षात घेऊन पोलिसानी उमेदवारांच्या विजयी मिरवणुकीला परवानगी नाकारली.

चिपळूण तालुक्यातील बुधवारी झालेले सरपंच, उपसरपंच पुढीलप्रमाणेः

मोरवणे-सरपंच संचिता जाधव, उपसरपंच सुनील सावर्डेकर, ताम्हणमळा-सरपंच  पूनम घाणेकर, उपसरपंच अनंत घाडे, वालोटी-सरपंच अवंतीका आंबेडे, उपसरपंच सचिन बामणे, तळसर-सरपंच सिध्दी पिटले, उपसरपंच अभिजित मोहिते, कोंडफणसवणे-सरपंच वैशाली झिंगरे, उपसरपंच सुरेश शिगवण, कुडप-सरपंच दत्ताराम राजेशिर्के, उपसरपंच अपर्णा राजेशिर्के, कडवड-सरपंच सुवर्णा सकपाळ, उपसरपंच महेश जाधव, वीर-सरपंच श्रेया वीरकर, उपसरपंच सुभाष जावळे, रेहळे-वैजी-सरपंच संदीप जाबरे, उपसरपंच गणेश गोगावले, कौंढरताम्हाणे -सरपंच मुग्धा गुरव, उपसरपंच दिलीप गुरव, आकले-सरपंच विशा मोहिते, उपसरपंच नितेश निकम, अनारी-सरपंच विनोद कदम, उपसरपंच सदानंद पवार, वाघिवरे-सरपंच गोपाळ कदम, उपसरपंच फैसल साबळे, तळवडे-सरपंच मनोज खोचाडे, उपसरपंच मंगेश केंबळे, तोंडली-सरपंच मेघ सावंत, उपसरपंच अनुष्का पवार, दहिवली बुद्रुक -सरपंच कीर्ती घाग, उपसरपंच सुहास पांचाळ, आगवे- सरपंच सोनाली चव्हाण, उपसरपंच अनिकेत भंडारी, वलोपे-सरपंच रवींद्र आयरे, उपसरपंच सुनील मोहिते, खरवते-सरपंच ज्ञानदेव घाग, उपसरपंच संजीवनी घाग, कळवंडे-सरपंच संजय नाचरे, उपसरपंच महादेव उदेग, कान्हे-सरपंच सुरेखा जाधव, उपसरपंच नीता जठार, पिंपळी बुद्रुक-सरपंच स्मिता राजवीर, उपसरपंच उस्मान बोदले, शिरळ- सरपंच शशिकांत राऊत, उपसरपंच फैयाज शिरवळकर, रिक्टोली-सरपंच दयानंद शिंदे, उपसरपंच सुप्रिया बाईत, पालवण-सरपंच तेजस्विनी झिंगे, उपसरपंच गणेश विचारे, येगाव-सरपंच संगीता होडे, उपसरपंच सचिन चव्हाण, मुंढे तर्फे सावर्डे- सरपंच प्रमोद डिके, उपसरपंच रवींद्र साळुंखे, मूर्तवडे-सरपंच स्मिता पवार, उपसरपंच बबन नेवरेकर, पाचाड-सरपंच नरेश घोले, उपसरपंच रमेश सुर्वे, कळमुंडी- सरपंच स्मिता थरवळ, उपसरपंच वैष्णवी सावंत, धामणवणे-सरपंच सुनील सावंत, उपसरपंच विजया वरेकर, दुर्गवाडी-सरपंच चेतना निकम, उपसरपंच मारुती बातकले.

Related Stories

जपानच्या ‘सुमिटोमो’ कंपनीला महाराष्ट्रात जागा देणार

Patil_p

रत्नागिरीकरांनी अनुभवले खंडग्रास सूर्यग्रहण!

Patil_p

मनोहर पर्रिकरांच्या मुलाला आपची खुली ऑफर

Abhijeet Khandekar

बँकेतील अफरातफरप्रकरणी जामीन अर्ज फेटाळला

Patil_p

कणकवलीत लक्झरी बसच्या अपघातात दोन ठार , तर ३० जखमी

Anuja Kudatarkar

बिबटय़ाच्या हल्ल्यात राजापूरच्या नायब तहसीलदार जखमी

Patil_p