Tarun Bharat

गायिका वैशाली भैसने – माडे हाती बांधणार राष्ट्रवादीचे घड्याळ!

ऑनलाईन टीम / मुंबई : 


गायिका वैशाली माडे आता लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. 31 मार्च रोजी वैशाली माडे मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेणार आहेत. दुपारी 12 वाजता हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. 


वैशाली माडे हिने अनेक चित्रपटात गाणी गाण्यासह मराठी मालिकांची शीर्षक गीते गायली आहेत. मराठीतील ‘बिग बॉस’ या रियालिटी शोमध्ये देखील वैशाली स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.


दरम्यान, वैशाली माडे एका सामान्य कुटुंबातील असून चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध गायिका असा प्रवास हा देखील संघर्षमय आहे. अमरावती जिल्ह्यातील खार तळेगाव येथे तिचा जन्म झाला असून तिचे माहेरचे नाव वैशाली भैसने आहे. बालपणी गरिबीमुळे त्यांना अनेक कष्ट सहन करावे लागले. मात्र, खडतर परिस्थितीत तिने स्वतः मधील गायिका जिवंत ठेवली. 


वैशालीने इरादा पक्का, मध्यमवर्ग, हंटर, कॅरी ऑन, 31 दिवस,  रणांगण, आटपाडी नाईट्स अशा मराठी चित्रपटांसह दमादम्म, बाजीराव मस्तानी, अंग्रेजी में कहते है आणि कलंक या हिंदी चित्रपटात देखील गाणी गायले आहेत. यासह वैशाली माडे ही 2008 मध्ये ‘झी मराठी’च्या मराठी ‘सा रे ग म प’च्या पर्वाची विजेती ठरली होती. 

Related Stories

अँटीमायक्रोबियल रंग नॅनो संमिश्रे संशोधनाला पेटंट

Abhijeet Khandekar

वारणेसह `ही’ पाच धरणे पन्नास टक्के भरली, विसर्ग सुरु

Archana Banage

मल्ल सम्राटचे खेळाडू करणार महाराष्ट्र केसरीत सिंधुदुर्गचे नेतृत्व

Anuja Kudatarkar

उद्धव ठाकरे राज्याला उद्ध्वस्त करायला निघालेत – नारायण राणे

Archana Banage

मसूरमध्ये डॉक्टरच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा

Patil_p

त्रालमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

datta jadhav