Tarun Bharat

गारगोटीत अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग, आरोपींना पोलीस कोठडी

Advertisements

प्रतिनिधी / गारगोटी

गारगोटी येथे अल्पवयीन मुलीच्या तोंडावर गुंगीचे औषध मारून अत्याचार केल्या प्रकरणी दोन्ही आरोपींना भुदरगड पोलिसांनी अटक करून कोल्हापूर येथील सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

गारगोटी येथे एकतीस डिसेंबर रोजी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी संशयित आरोपी सचिन अशोक शिंदे(गारगोटी) आणि त्याला मदत करणारा संग्राम महादेव केसरकर (पाल) या दोघांवर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी धाडसत्र सुरू केले. यामध्ये आरोपी शिंदे याला हेदवडे येथील एका जनावरांच्या गोठ्यात पकडले तर संग्राम केसरकर याला पाल येथील त्याच्या घरातून पकडण्यात आले.दोन्ही आरोपीना भुदरगड पोलिसांनी अटक केली असून गुरुवारी कोल्हापूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता या आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Stories

कोल्हापूर : महावितरणचे कंत्राटी कामगार लाचलुचपतच्या जाळ्यात

Abhijeet Shinde

नांदणी येथील तरुणाची गळफास घेत आत्महत्या

Sumit Tambekar

लॉकडाऊनसंदर्भात निर्णय मुख्यमंत्री घेणार – मंत्री मुश्रीफ

Abhijeet Shinde

महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांंवर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

बोरवडे येथे विहीरीत सापडला ऊसतोड मजुराचा मृतदेह

Abhijeet Shinde

इचलकरंजीत तीन पानी जुगार अड्यावर छापा; 80 हजारांचा मुद्देमाल जप्त

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!