Tarun Bharat

गारगोटीत कंत्राटदाराची कार फोडून जीवघेणा हल्ला

कामचे कमीशन दिले नसल्याच्या कारणावरून हल्‍ला केल्याचा कंत्राटदाराचा आरोप

Advertisements

गारगोटी : प्रतिनिधी

रस्त्याचे काम सुरु केल्याच्या कारणावरून कंत्राटदाराची स्विफ्ट कार फोडून जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली गारगोटी इथं घडली. याप्रकरणी कंत्राटदार शक्तिसिंह सारंग यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भुदरगड पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

रस्त्याचे काम करण्यासाठी सात टक्के कमीशन न दिल्याच्या कारणावरून भाडोत्री गुंडांनी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप कंत्राटदार आशिष पोवार यांनी केला आहे. याबाबत भुदरगड पोलिस व घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, भुदरगड तालुक्यातील वेंगरूळ व सोनुर्ली कामाचे जिल्हा परिषदेचे टेंडर ऑनलाइन पद्धतीने कमी दराने भरले होते. यावेळी वरंडेकर यांनी सात टक्के कमीशनची मागणी केली होती. कमी दराने टेंडर भरले असल्यामुळे कमीशन देणे शक्य नव्हते. आज कामाची पाहणी करण्यासाठी गेलो असता एकनाथ धनाजी वरंडेकर, त्याचा भाचा गणेश पंदारे व इतर 5 ते 6 जणांनी हातात काठया घेऊन मला अडवून या भागात काम करायचे नाही तर तंगडे मोडून ठेवू अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. त्यामुळे घाबरून घरी परत असतांना या सर्वांनी मला जीवे मारण्यासाठी पाठलाग सुरु ठेवला होता.
गारगोटीतील जोतीबा चौकात स्प्लेंडर मोटरसायकल वरुन आलेल्या एका भाडोत्री गुंडाने लोखंडी रॉडने माझ्यावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात गाडीची पुढील पाठीमागील काच फुटली असुन गाडीचे नुकसान झाले असल्याची फिर्याद भुदरगड तालुक्यातील आकुर्डे येथील कंत्राटदार शक्तिसिंह सारंग यांनी पोलीसात दिली. दरम्यान कमीशन दिले नसल्याच्या कारणावरून जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप कंत्राटदार आशिष पोवार यांनी केला आहे. या घटनेची नोंद भुदरगड पोलीसात झाली आहे.

Related Stories

हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथे विज कोसळून शेतमजुराचा मृत्यू

Abhijeet Shinde

सांगली : दुधोंडी येथे तिहेरी खून ; मोहिते- साठे गटात धुमश्चक्री

Abhijeet Shinde

कोल्हापूर : बाप्पांनी दिली अर्थचक्राला गती

Abhijeet Shinde

पेढा भरवून पुष्पगुच्छ देणारे राज्यपाल मी पहिल्यांदाच पाहिले

datta jadhav

कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसतोड मजूर पळून जात असल्याने शेतकरी चिंतातूर

Abhijeet Shinde

कोल्हापूर : माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना पुरस्कार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!